Steve Smith: बाबो! एका चेंडूत तब्बल 16 धावा... स्मिथची बॅट काही ऐकेना, पाहा Video

स्टीव्ह स्मिथने बीग बॅश लीगमध्ये सोमवारी खेळलेल्या सामन्यातील एका चेंडूवर चक्क 16 धावा निघाल्या.
Steve Smith in Big Bash League
Steve Smith in Big Bash LeagueDainik Gomantak

Steve Smith: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. स्मिथ हा टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जात असला, तरी सध्या त्याची बॅट टी20 क्रिकेटमध्ये चांगलीच तळपत आहे. स्मिथ सध्या बीग बॅश लीग 2022-23 स्पर्धेत खेळण्यात व्यस्त असून सोमवारी त्याने खेळलेल्या एका चेंडूवर चक्क 16 धावा निघाल्या.

सोमवारी बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स विरुद्ध होबार्ट हरिकेन यांच्यात सामना झाला. यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिडनी सिक्सर्स संघाकडून दुसऱ्याच षटकात स्मिथने आक्रमक पवित्रा अवलंबला होता. या षटकात होबार्टकडून जोएल पॅरिस गोलंदाजी करत होता.

Steve Smith in Big Bash League
Steve Smith पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार! 'या' कारणामुळे घेण्यात आला निर्णय

जोएलने टाकलेल्या पहिल्या दोन चेंडूवर स्मिथला धाव करता आली नव्हती. पण तिसऱ्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार ठोकला. पण हा चेंडू पंचानी नोबॉल दिला. त्यामुळे स्मिथला 6, तर संघाला 7 धावा मिळाल्या.

तसेच पुढचा फ्री हिटचा चेंडू जोएलने वाईड टाकला. हा चेंडू यष्टीरक्षक मॅथ्यू वेडलाही पकडता आला नाही. त्यामुळे चेंडू थेट सीमापार करून गेला. त्यामुळे यावर 5 धावा मिळाल्या म्हणजेच जोएलने अधिकृत चेंडू न टाकताही 12 धावा आधीच दिल्या होत्या.

अखेर त्याने पुढचा चेंडू मिडल स्टंपवर टाकत या षटकातील तिसरा अधिकृत चेंडू टाकला. पण त्यावरही स्मिथने चौकार मारला. त्यामुळे एकाच चेंडूवर तब्बल १६ धावा निघाल्या. यातील १० धावा स्मिथच्या खात्यातही जमा झाल्या. या संपूर्ण षटकात जोएलने २१ धावा दिल्या. त्यातील १५ धावा स्मिथने काढल्या.

Steve Smith in Big Bash League
Team India: टीम इंडियाचा 'हा' धाकड निवृत्तीनंतर मैदानात परतला, भारतासाठी विश्वचषक...!

पुढे स्मिथने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर काहीवेळात तो बाद झाला. त्याने एकूण 33 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर सिडनीने 20 षटकात 7 बाद 180 धावा केल्या.

त्यानंतर 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन संघाला 20 षटकात 8 बाद 156 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 24 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

स्मिथ दमदार फॉर्ममध्ये

स्मिथला सोमवारी झालेल्या सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने याआधी झालेल्या अखेरच्या दोन बीग बॅश सामन्यात शतकेही झळकावली. त्याने सिडनी थंडर्सविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी केली होती. तसेच ऍडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध 101 धावांची खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com