20 वर्षीय राधाची टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

राधाने महिला टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सलग 25 डावामध्ये किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे.

(20 year old Radhas brilliant performance in T20 cricket) भारतीय महिला संघासाठी मागील काही दिवस चांगले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या एकदिवसीय़ मालिकेमध्ये भारतीय महिला संघाला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-ट्वेन्टी मालिकेतही संघ 0-2 असा पिछाडीवर पडला. रविवारी पार पडलेल्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात आफ्रिकेने 6 गडी राखून मात दिली. त्यामुळे भारतीय महिला संघाला आपेक्षीत अशी  चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र भारतीय महिला संघाची फिरकीपटू राधा यादवने टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

राधाने महिला टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सलग 25 डावामध्ये किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. तर राधा टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्य़े 50 गडी बाद करणारी जगातील तिसरी युवा गोलंदाज तर भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. राधाने 36 वा टी-ट्वेन्टी सामना खेळत ही कामगिरी केली. आफ्रिकेची लीझेल ली ही राधाची 50 विकेट ठरली आहे. (20 year old Radhas brilliant performance in T20 cricket)

INDvsENG : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला बसला मोठा फटका 

राधाचे हा विक्रम करतानाचे वय 20 वर्ष होते. सर्वात कमी वयामध्ये 50 फलंदाजांना माघारी पाठवणारी महिला खेळाडूंच्या यादीत बांग्लादेश संघाची नाहीदा अख्तर पहिल्यास्थानी आहे. तिने 20  वर्षातच हा कारनामा आपल्या नावावर केला होता. तर दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघाची महिला खेळाडू सोफी एलस्टोन आहे. दोन चेंडूमध्ये सहा धावांची आवश्यकता असताना भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने टाकलेल्या नो-बॉलमुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. आफ्रिकेने भारताचे आव्हान 6 गडी राखून पार करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेतली.

 

संबंधित बातम्या