IPL Final CSK vs GT Sai Sudharsan: 21 वर्षीय साई सुदर्शनचा जलवा, अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू

Sai Sudharsan: साईने CSK च्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने 33 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले.
Sai Sudharsan
Sai SudharsanDainik Gomantak

IPL Final 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर गुजरात संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 214 धावा केल्या. यादरम्यान 21 वर्षीय स्टार खेळाडू साई सुदर्शनची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली.

साईने CSK च्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने 33 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले.

साई सुदर्शनने आयपीएल फायनलमध्ये झंझावाती अर्धशतक ठोकले

दरम्यान, यंदाच्या आयपीएल (IPL) मोसमातील साई सुदर्शनचे हे तिसरे अर्धशतक आहे. साईने आयपीएल फायनलमध्ये 47 चेंडूत 96 धावांची तूफानी खेळी खेळली. त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 204.25 होता. सुदर्शनशिवाय ऋद्धिमान साहाने 54 तर शुभमन गिलने 39 धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पथिरानाने 2 बळी घेतले.

Sai Sudharsan
MS Dhoni Last Match: धोनीबाबत 2019 वर्ल्डकपचीच IPL मध्येही होणार पुनरावृत्ती? त्या घटनेने फॅन्स इमोशनल

सुदर्शनने एकाच डावात अनेक विक्रम केले

साई सुदर्शन फायनलमध्ये शतक झळकावण्यापासून हुकला असला तरी त्याने आपल्या वेगवान खेळीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. IPL फायनलमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा सुदर्शन हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

त्याचे वय 21 वर्षे 226 दिवस आहे. सध्या हा विक्रम मनन वोहराच्या नावावर आहे, ज्याने 2014 च्या फायनलमध्ये पंजाबसाठी अर्धशतक झळकावले होते. तेव्हा त्याचे वय 20 वर्षे 318 दिवस होते.

IPL फायनलमध्ये 50+ धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू

20 वर्षे, 318 दिवस - मनन वोहरा (पीबीकेएस) वि केकेआर, बंगळुरु, 2014

21 वर्षे, 226 दिवस - साई सुदर्शन (GT) वि CSK, अहमदाबाद, 2023

22 वर्षे, 37 दिवस - शुभमन गिल (KKR) वि CSK, दुबई, 2021

23 वर्षे, 37 दिवस - ऋषभ पंत (DC) वि एमआय, दुबई, 2020

Sai Sudharsan
IPL 2023: आयपीएल फायनलमध्ये हार्दिक करणार मोठा रेकॉर्ड नावावर, धोनीची इच्छा असूनही...!

आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

117* - शेन वॉटसन (CSK) विरुद्ध SRH, मुंबई वानखेडे, 2018

115* - रिद्धिमान साहा (पीबीकेएस) वि केकेआर, बंगळुरु, 2014

96 - साई सुदर्शन (GT) वि CSK, अहमदाबाद, 2023

95 - मुरली विजय (CSK) विरुद्ध RCB, चेन्नई, 2011

94 - मनीष पांडे (KKR) विरुद्ध PBKS, बंगळुरु, 2014

Sai Sudharsan
IPL 2023, CSK vs GT: धोनीने जिंकला टॉस! चेन्नई-गुजरात ट्रॉफी जिंकण्यास सज्ज, पाहा Playing XI

IPL प्लेऑफमध्‍ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू

112* - रजत पाटीदार (RCB) वि LSG, कोलकाता, 2022 एलिमिनेटर

96 - साई सुदर्शन (GT) विरुद्ध CSK, अहमदाबाद, 2023 फायनल

94 - मनीष पांडे (KKR) विरुद्ध PBKS, बंगळुरु, 2014 फायनल

89 - मनविंदर बिस्ला (KKR) विरुद्ध CSK, चेन्नई, 2012 फायनल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com