
Eng Vs SA: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 41 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 234 धावा केल्या. गेल्या काही सामन्यांमध्ये इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला होता. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात कर्णधार जोस बटलरच्या 7 चेंडूत 22 धावा, मलानच्या 23 चेंडूत 43 धावा, जॉनी बेअरस्टोच्या 53 चेंडूत 90 धावा आणि त्यानंतर मोईन अलीने 18 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. मोईन अली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक केले.
दरम्यान, 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची (South Africa) सुरुवात खराब झाली. परंतु ट्रिस्टन स्टब्सच्या खेळीने एका क्षणी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा उंचावल्या. त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात त्याने आफ्रिकन स्टार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि अनुभवी एबी डिव्हिलियर्सचा (AB de Villiers) विक्रम मोडला. खरे तर, स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेसाठी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 चेंडूत अर्धशतक करणारा सर्वात वेगवान आणि सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
दुसरीकडे, स्टब्सने वयाच्या 21 वर्षे आणि 347 दिवसांत अर्धशतक पूर्ण केले. क्विंटन डी कॉकने 23 वर्षे 92 दिवस आणि एबी डिव्हिलियर्सने वयाच्या 23 वर्षे 279 दिवसांत ही कामगिरी केली होती. ट्रिस्टन स्टब्सने 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 28 चेंडूत 72 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 2 चौकार लगावले. मात्र, स्टब्सची ही खेळी आफ्रिकेला जिंकता आली नाही. आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 193 धावाच करु शकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.