23 वर्षीय ओसाकाला माध्यमांशी न बोलणं पडलं महागात

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

नाओमी ओसाकाला एका चुकीसाठी तब्बल 15,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू (Women's tennis players) असणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाला (Naomi Osaka) एका चुकीसाठी तब्बल 15,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर अशी प्रकारची चूक पुन्हा झाल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले अशी तंबीही देण्यात आली आहे. फ्रेंच ओपनच्या (French Open) पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर ओसाकाने माध्यमांशी(media) बोलण्याचे मात्र टाळले आहे. त्यामुळे ओसाकाला दंड बसला आहे. (23year old Osaka had to pay dearly for not speaking to the media)

ओसाकाने फ्रेंच ओपनमध्ये शानदार सुरुवात केली आणि रोमानियाच्या पेट्रिशिया मारिया टिगचा पराभव करुन फेरीत प्रवेश केला आहे. चारवेळा ग्रॅंड स्लॅम (Grand Slam) विजेती असलेल्या ओसाकाने 1तास 47 मिनिटे चाललेल्या सामन्यामध्ये 63 व्या क्रमांकावर असलेल्या पेट्रोशियाला 6-4,7-6 असे पराजित केले.

यूईएफा चॅम्पियन्स लीगमध्ये चेल्सीची विजेतेपदावर मोहोर 

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) आणि यूएस ओपनचे (US Open) माजी विजेता असलेली ओसाका 2019 नंतर या स्पर्धेत खेळत होती. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये ओसाकाला भाग घेता आला नव्हता. ग्रॅंड स्लॅम टूर्नामेंट्सच्या नियमांनुसार, जर खेळाडू सामन्यानंतर पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलण्यास ओसाकाने नकार देणार असल्यास तिला 20,000 अमेरिकन डॉलर्सपर्यंतचा दंड होऊ शकतो. 

''23 वर्षीय असलेल्या ओसाकाला दंड आणि भविष्यात ग्रॅंडस्लॅमबाबतच्या निलंबनाच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. ग्रॅंडस्लॅम नियंमामधील मुख्य घटक म्हणजे सामन्याचा निकाल काहीही येवो माध्यमांशी बोलणे ही जबाबदारी आहे,'' असे आयोजकांनी यावेळी सांगितले. ओसाकाने फ्रेंच ओपनदरम्यान आपण माध्यमांशी बोलणार नाही असे सांगितले होते.

संबंधित बातम्या