राष्ट्रीय स्पर्धा पुढील वर्षी गोव्यातच होणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर पडलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याबाबत गोवा ऑलिंपिक असोसिएशन (जीओए) आशावादी आहे, त्या दृष्टीने संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पणजी :  कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर पडलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याबाबत गोवा ऑलिंपिक असोसिएशन (जीओए) आशावादी आहे, त्या दृष्टीने संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असलेली गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोविड-१९ महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली. पुढील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धा होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात राष्ट्रीय स्पर्धा होणे योग्य ठरेल, असे जीओए शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. ‘‘आजच्या बैठकीतील चर्चेवर आम्ही खूष आहोत. मुख्यमंत्र्यांनी आमचे म्हणणे सविस्तर ऐकले. राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे गोव्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. येत्या डिसेंबरमध्ये ‘आयओए’ची (भारतीय ऑलिंपिक संघटना) बैठक आहे, तोपर्यंत आम्हाला राष्ट्रीय स्पर्धेबाबतचा निर्णय कळवावा लागेल. मुख्यमंत्री खूपच सकारात्मक आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगांने विविध बाबींत लक्ष घालण्याचे त्यांनी आश्वासन दिले असून लवकरच आणखी एक बैठक अपेक्षित आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याबाबत आम्ही आशावादी आहोत,’’ असे श्रीपाद 

संबंधित बातम्या