Chess Olympiad चे शानदार उद्घाटन, सीएम स्टालिन म्हणाले, 'आम्हाला माहित आहे...'

Chess Olympiad In Tamil Nadu: चेन्नईतील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले.
PM Modi
PM Modi Twitter / ANI

Chess Olympiad: चेन्नईतील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. भारतात आयोजित करण्यात येत असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन समारंभात येथील नेहरु इनडोअर स्टेडियम प्रथमच उजळून निघाले. बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा 44 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी, चेन्नईचा मुख्य परिसर भव्य पद्धतीने सजवण्यात आला होता.

"पंतप्रधानांना बुद्धिबळ आवडते"

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमुळे राज्यात पर्यटन आणि उद्योगाची भरभराट होईल, असे स्टालिन यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री स्टालिन पुढे म्हणाले की, 'मला माहित आहे की, पंतप्रधानांना बुद्धिबळ किती आवडते ते. मोदींनी गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री असताना 20,000 हून अधिक खेळाडूंसह एक भव्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती.'

PM Modi
Chess Olympiad: ग्रँडमास्टर अनुराग म्हामल अंगोला देशाच्या प्रशिक्षकपदी

36% भारतीय ग्रँडमास्टर तामिळनाडूचे आहेत - स्टॅलिन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक केले. ते म्हणाले, "आज चेन्नईमध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन करणे आपल्या पंतप्रधानांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मोदीजींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका भव्य बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन केले होते." स्टालिन पुढे म्हणाले की, 'सुमारे 36% भारतीय ग्रँडमास्टर तामिळनाडूचे आहेत. चेन्नईला 'भारताची (India) बुद्धिबळ राजधानी' म्हणता येईल.'

भारत हे बुद्धिबळाचे उगमस्थानः मोदी

विशेष कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी तामिळनाडूचे (Tamil Nadu) कौतुक केले. उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले, "भारतात होणाऱ्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात आली आहे.'

PM Modi
44th Chess Olympiad Torch Relay : ''आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही''

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'बुद्धिबळाचे उगमस्थान असलेल्या भारतात बुद्धिबळ ऑलिम्पियाड पहिल्यांदाच होत आहे.' पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, "तामिळनाडूमध्ये विविध खेळांचे प्रतिनिधित्व करणारी सुंदर शिल्पे असलेली अनेक मंदिरे आहेत. तामिळनाडूचा बुद्धिबळाशी ऐतिहासिक संबंध आहे. राज्याने अनेक बुद्धिबळ मास्टर्स निर्माण केले आहेत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com