थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी संघ जाहीर ; पी. व्ही. सिंधू, सायना नेहवालचा समावेश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

ऑलिंपिक पात्रता लक्षात घेऊन भारतीय बॅडमिंटन संघटनेने टोकियो ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल यांच्यासह आठ खेळाडूंची निवड केली आहे.

मुंबई : ऑलिंपिक पात्रता लक्षात घेऊन भारतीय बॅडमिंटन संघटनेने टोकियो ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल यांच्यासह आठ खेळाडूंची निवड केली आहे. ऑलिंपिक पात्रतेची संधी असलेल्या सर्व खेळाडूंना या तीन स्पर्धांसाठी निवडण्यात आले आहे. सिंधू, साईनासह भारतीय संघात बी साईप्रणीत, किदांबी श्रीकांत, सात्विकसाईराज रांकिरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी यांचा समावेश आहे. हे खेळाडू योनेक्‍स थायलंड ओपन (१२ ते १७ जानेवारी), टोयोटा थायलंड ओपन (१९ ते २४ जानेवारी) आणि जागतिक मालिका अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत (२७ ते ३१ जानेवारी) सहभागी होतील. 

कोरोनाच्या आक्रमणामुळे मार्चपासून जागतिक क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले आहे. हेच बॅडमिंटनबाबतही घडले. श्रीकांत सोडल्यास यापैकी एकही खेळाडू मार्चनंतर एकाही स्पर्धेत खेळलेला नाही. श्रीकांत ऑक्‍टोबरमध्ये डेन्मार्क ओपन स्पर्धेत खेळला होता. अखेर बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहेत. थायलंडमधील या स्पर्धांपासून आंतरराष्ट्रीय मोसमास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. बहुतेक खेळाडू सात ते आठ महिने एकाही स्पर्धेत खेळलेले नाहीत. 

 

अधिक वाचा :

विराट कोहली मायदेशातूनही टिम इंडियाला करणार चिअर अप..! 

गोवा ऑलिंपिक भवनासाठी विद्यापीठानजीक जागेच्या प्रस्ताव ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना मुख्यमंत्र्यांचे पत्र

संबंधित बातम्या