IPL 2023 Auction: केवळ 87 जागांसाठी तब्बल 991 खेळाडूंची लिलावासाठी नोंदणी, वाचा संपूर्ण तपशील

आयपीएल 2023 लिलावासाठी एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
IPL 2023 Auction
IPL 2023 AuctionDainik Gomantak

IPL 2023 Auction: इंडियन प्रीमीयर लीग 2023 हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर 2022 रोजी कोची येथे पार पडणार आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत खेळोडूंना नोंदणी करायची होती. आता ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 991 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.

या 991 खेळाडूंमध्ये 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडू आहेत. तसेच यातील 185 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळलेले (कॅप खेळाडू) आहे, तर 786 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा (अनकॅप खेळाडू) अनुभव नाही आणि 20 खेळाडू सहसदस्य असलेल्या संघांचे आहेत.

IPL 2023 Auction
IPL Auction 2023: आयपीएल लिलावाची तारीख बदला, फ्रँचायझींची BCCI कडे मागणी

त्याचबरोबर 991 खेळाडूंचा सखोल तपशील सांगायचा तर भारताचे 19 कॅप खेळाडू आहेत. तर 166 परदेशी कॅप खेळाडू आहेत. आयपीएलचा अनुभव असलेले 91 अनकॅप भारतीय खेळाडू असून 3 परदेशी अनकॅप खेळाडू आहेत. तसेच आयपीएलचा अनुभव नसलेले 604 अनकॅप भारतीय खेळाडू असून 88 परदेशी अनकॅप खेळाडू आहेत.

विशेष म्हणजे सर्व 10 संघांत मिळून केवळ 87 खेळाडूंसाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे तेवढ्याच खेळाडूंना बोली लागू शकते. यात 30 परदेशी खेळाडूंवर बोली लागू शकते. दरम्यान सर्व फ्रँचायझींनी संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी यापूर्वीच जाहीर केली होती.

आयपीएल 2023 लिलावासाठी नोंदणी केलेल्या 277 परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 57 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा 52 खेळाडूंचा समावेश आहे.

लिलावासाठी नोंदणी केलेले परदेशी खेळाडू (देशानुसार आकडेवारी) -

अफगाणिस्तान - 14

ऑस्ट्रेलिया - 57

बांगलादेश - 6

इंग्लंड - 31

आयर्लंड - 8

नामिबिया - 5

नेदरलँड्स - 7

न्यूझीलंड - 27

स्कॉटलंड - 2

दक्षिण आफ्रिका - 52

श्रीलंका - 23

युएई - 6

वेस्ट इंडीज - 33

झिम्बाब्वे - 6

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com