MS Dhoni: 'कॅप्टनकूल'चा सुपर फॅन! चक्क लग्नपत्रिकेवरच छापला लाडक्या माहीचा फोटो

एमएस धोनीच्या एका चाहत्याने चक्क त्याचा फोटो लग्नपत्रिकेवर छापला आहे, या लग्नपत्रिकेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak

A Fan Printed MS Dhoni Photo on His Wedding Card: कॅप्टनकूल म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची जबरदस्त फॅन फोलोविंग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही धोनीच्या लोकप्रियतेमध्ये कोणतीच घसरण झालेली नाही. त्याचे चाहते अनेकदा त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लढवत असतात.

आतातर चक्क एका चाहत्याने लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो छापला आहे. या लग्नपत्रिकेचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसते की नवरा-नवरीच्या नावाच्या उजव्या बाजूला धोनीचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोमध्ये धोनीबरोबर 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी देखील दिसत आहे. भारतीय संघाने 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते.

MS Dhoni
MS Dhoni: CSK ने वाढवली फॅन्सची धडधड! 7 वाजून 29 मिनिटांनी शेअर केला कॅप्टनकूलचा 'तो' व्हिडिओ

धोनीला सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्येही गणण्यात येते. तो भारताचा यशस्वी कर्णधारांपैकी एक असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत. तो तीन आयसीसी विजेतीपदे जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय कर्णधार आहे. तसेच भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षकही आहे.

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

MS Dhoni
MS Dhoni: वेलकम थाला! फुलांची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात 'कॅप्टनकूल' चेन्नईत दाखल; Video Viral

दरम्यान, धोनीने जरी 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहे. यंदाचा आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो, अशी सध्या चर्चा सुरू आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यानेही धोनीचा हा अखेरचा हंगाम असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. हेडन यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.

धोनीने सीएसकेने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 4 वेळा आयपीएल विजेतेपदही जिंकले आहे. मात्र, धोनी यावर्षी कर्णधार म्हणून खेळणार की ही जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे सोपवणार हे पाहावे लागणार आहे.

धोनीने गेल्यावर्षी सीएसकेचे कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे सोपवले होते. पण जडेजाने अर्धा आयपीएल हंगाम झालेला असतानाच हे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे धोनीने पुन्हा ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com