Rohit Sharma Viral Video: चक्क 'त्या' व्यक्तीने हिटमॅनकडे केली किसची मागणी! रोहितने कशी दिली रिऍक्शन पाहा

Video: रोहित शर्माला एका व्यक्तीने चक्क किस करण्याची विनंती केली होती.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

A Man Ask For Kiss to Rohit Sharma: क्रिकेट भारतातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्याचमुळे स्टार खेळाडूंची क्रेज चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे चाहत्यांचे वेगवेगळे अनुभव देखील खेळाडूंना येतात. नुकतेच असाच एक विचित्र अनुभव मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आला आहे.

सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतेय की रोहित प्रवास करण्यासाठी चाललेला आहे, त्याच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक आहेत. पण त्याचवेळी त्याच्यासमोर एक व्यक्ती येतो.

तो व्यक्ती त्याला गालावर किस करण्याची विनंती करत असल्यासारखे दिसते. ते पाहून रोहितही चकीत झाला. त्यानंतर तो पटकन पुढे जात बसमध्ये बसला. दरम्यान, हा व्हिडिओ केव्हाचा आहे, याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

Rohit Sharma
Chennai Super Kings: प्लेऑफमध्ये पोहोचताच CSK ला मोठा धक्का, 'हा' मॅचविनर IPL 2023 मधून अचानक बाहेर

रोहित करतोय संघर्ष

रोहितसाठी आयपीएल 2023 हंगाम वैयक्तिकरित्या फारसा चांगला राहिलेला नाही. तो मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 19.77 च्या सरासरीने 257 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या केवळ एकाच अर्धशतकाचा समावेश आहे.

मुंबईला प्लेऑफसाठी विजय आवश्यक

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. त्यांना अखेरचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात मुंबईला विजय गरजेचाच आहे.

जर या सामन्यात विजय मिळवला, तरी मुंबईला आशा करावी लागेल की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गुजरात टायटन्सविरुद्ध पराभूत होतील. तसेच जर मुंबई हैदराबादविरुद्ध पराभूत झाले, तर मात्र मुंबईचे आव्हान संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

Rohit Sharma
RCB vs GT मॅचवर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कसे असेल IPL Playoff चे समीकरण?

मुंबईने आयपीएल 2023 हंगामात आत्तापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यामध्ये मुंबईने 7 सामने जिंकले आहेत, तसेच 6 सामने पराभूत झाले आहेत.

सध्या आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com