सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराट कोहलीच्या नावावरती नवा विक्रम

विराट कोहलीने या 500 डावांमध्ये 23558 धावा केल्या आहेत, जे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च विक्रम आहे.
सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराट कोहलीच्या नावावरती नवा विक्रम
Virat Kohli Highest Record In HistoryDainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच दिवसांपासून एकही मोठी खेळी खेळू शकलेला नाही. कोहलीच्या बॅटमधून शतकाची प्रतीक्षा दोन वर्षांपेक्षा जास्त झाली आहे. मात्र, असे असूनही भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराचे विक्रम बॅटिंगने थांबत नाहीत. असाच विक्रम कोहलीने केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या डावातही केला.

Virat Kohli Highest Record In History
Ind VS SA: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कधीही घडले नाही ते...

केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर विराटला जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) त्याचा दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरावे लागते, तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधील ही त्याची एकूण 500वी खेळी होती. कोहलीने या 500 डावांमध्ये 23558 धावा केल्या आहेत, जे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च विक्रम (Highest Record In History) आहे.

विराट कोहलीने या बाबतीत जागतिक क्रिकेटच्या सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 500 आंतरराष्ट्रीय डावात 22214 धावा केल्या होत्या.

Virat Kohli Highest Record In History
Indian Super League: चेन्नईयीनला हैदराबादने बरोबरीत रोखले

कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यात भारतीय कर्णधाराला मुकावे लागले. या कसोटीत कोहलीला हे स्थान गाठण्याची संधी होती. पहिल्या डावात त्याने 79 धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या डावात 67 धावा हव्या होत्या, मात्र त्याला केवळ 29 धावा करता आल्या. आता कोहलीला आपल्या 100व्या कसोटीत ही कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.