Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियासाठी शतक झळकावणाऱ्या आक्रमक फलंदाजाचे मोठे विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिंचच्या नावावर पाच हजारांहून अधिक धावा आहेत. या आक्रमक फलंदाजाने 145 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत.
Aaron Finch
Aaron FinchDainik Gomantak

Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाझ फलंदाज आरोन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उद्या रविवारी आपल्या कारकिर्दीतील तो शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. फिंच गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. यावर्षी 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला फक्त 13 च्या फलंदाजीच्या सरासरीने 169 धावा करता आल्या. त्यामुळेच तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिंचच्या नावावर पाच हजारांहून अधिक धावा आहेत. या आक्रमक फलंदाजाने 145 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 39.13 आणि स्ट्राईक रेट 87.83 आहे. अॅरॉन फिंचने वनडे क्रिकेटमध्ये 17 शतके झळकावली आहेत. तो ऑस्ट्रेलियासाठी चौथा सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज आहे. एकट्याने इंग्लंडविरुद्ध 7 शतके झळकावली आहेत. फिंचने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 30 हून अधिक अर्धशतकेही झळकावली आहेत.

Aaron Finch
Pak Vs SL: फायनलपूर्वी पाकिस्तानला श्रीलंकेचा धडा; पाच गडी राखून मिळवला विजय
Aaron Finch
Asia Cup 2022: 'ओवररिएक्ट करायची गरज नाही, माझे काम...', पराभवावर राहुल द्रविडची प्रतिक्रिया

फिंच टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणे सुरू ठेवणार

आरोन फिंच सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. फिंचची टी-20 मधील कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली आहे. त्याने 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 35.24 च्या सरासरीने 2855 धावा केल्या आहेत. या 65 सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले आहे. सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद 2500 धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 172 धावांची इनिंग खेळली आहे. टी-20 मध्ये कर्णधाराने खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. ऑस्ट्रेलियासाठी T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com