आंतरराष्ट्रीय T20 मधून अ‍ॅरॉन फिंच घेणार निवृत्ती

ऑस्‍ट्रेलिया ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये होणाऱ्या टी-20 विश्‍वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.
Aaron Finch
Aaron FinchDainik Gomantak

Aaron Finch: ऑस्‍ट्रेलिया ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये होणाऱ्या टी-20 विश्‍वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यजमान संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अॅरॉन फिंचने म्हटले की, 'ऑस्ट्रेलियन संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंसाठी ही शेवटची स्पर्धा असू शकते आणि त्यापैकी मी एक आहे.' (Aaron Finch Hints At T20 Retirement Post 2022 World Cup In October November)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला (Australia) T20 विश्वचषकाचा किताब आपल्याकडेच ठेवायचा आहे, जो संघाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव करुन जिंकला होता. यावेळी फिंच आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असून पुन्हा एकदा विश्वषचकाचा किताब संघाकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Aaron Finch
भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिकेची घोषणा: वाचा कधी होणार कोणता सामना

दुसरीकडे, फिंच ने Cricket.Com.Au शी बोलताना सांगितले की, “जर सर्व काही ठीक झाले तर काही खेळाडूंसाठी हा पूर्णविराम असू शकतो. (त्याच्यासह अनेक खेळाडू T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होत आहेत). मला वाटते की, जेव्हा लोक वयाच्या मध्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा असेच घडते. डेव्ही (वॉर्नर) काहीतरी करत राहतो, तो आणखी 10 वर्षे खेळू शकतो.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com