एबी डिव्हिलियर्सचा IPL ला ही अलविदा

आता एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आयपीएलमध्ये खेळणार नाही किंवा बिग बॅश, पीएसएल किंवा इतर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही.
एबी डिव्हिलियर्सचा IPL ला ही अलविदा
AB de VilliersDainik Gomantak

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, मात्र आता या दिग्गज खेळाडूनेही फ्रँचायझी क्रिकेटला अलविदा केला आहे. म्हणजे आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळणार नाही किंवा बिग बॅश, पीएसएल किंवा इतर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या संपूर्ण T20 कारकिर्दीत 9424 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सने 4 शतके, 69 अर्धशतके केली आहेत. 340 T20 सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 37.24 होती जी खरोखरच प्रशंसनीय आहे. मिस्टर 360 डिग्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या डीव्हिलियर्सने आपल्या टी-20 कारकिर्दीत 436 षटकार ठोकले. यासोबतच त्याने 230 झेलही घेतले.

AB de Villiers
सूर्यकुमार यादव ट्रेंट बोल्टला म्हणतोय 'थँक्स'

एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली. डिव्हिलियर्सने म्हटले की, 'माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे.

बंगळुरुला मोठा धक्का

दरम्यान, एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सर्वात मोठ्या मॅच विजेत्यांपैकी एक होता. मेगा लिलावापूर्वी बंगळुरुला निश्चितपणे त्याला कायम ठेवायचे होते, परंतु डिव्हिलियर्सने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांत 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता आणि त्याच्या बॅटने 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली.

डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एक भावनिक ट्विट केले आहे. आरसीबीने म्हटले, 'एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एका युगाचा अंत झाला आहे. एबी तुझ्यासारखा अफलातून खेळाडू होणे नाही. आरसीबीमध्ये आम्हाला तुझी खूप आठवण येईल. निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com