एबी डिव्हिलियर्स पुन्हा पुनरागमनाच्या मूडमध्ये, 'या' दोन संघात आजमावणार नशीब !

एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) प्रत्यक्षात खेळाडू म्हणून नव्हे तर सपोर्टिंग स्टाफ म्हणून पुनरागमन करण्याचा विचार करत आहे.
एबी डिव्हिलियर्स पुन्हा पुनरागमनाच्या मूडमध्ये, 'या' दोन संघात आजमावणार नशीब !

Ab De Villiers

Dainik Gomantak 

मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली होती. या विस्फोटक फलंदाजाने आयपीएललाही अलविदा केला आहे, मात्र आता डिव्हिलियर्स पुन्हा पुनरागमन करण्याचा विचार करत आहे. तुम्ही नवल काही वाटून घेऊ नका. एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) प्रत्यक्षात खेळाडू म्हणून नव्हे तर सपोर्टिंग स्टाफ म्हणून पुनरागमन करण्याचा विचार करत आहे. खुद्द एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका (South Africa) किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (Royal Challengers Bangalore) भविष्यात एखादी छोटीशी भूमिका बजावायला आवडेल, असे डिव्हिलियर्सने संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, गेल्या काही वर्षांपासून आम्ही युवा खेळाडूंना मदत करत आहोत. भविष्यातही युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे.

<div class="paragraphs"><p>Ab De Villiers</p></div>
IPL 2022: 'या' नव्या IPL संघाचा आशिष नेहरा असणार मुख्य प्रशिक्षक, गॅरी कर्स्टन मेंटर

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, 'मला विश्वास आहे की आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिका संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्यासाठी खूप काही शिल्लक आहे. पुढे काय होईल हे मला काही माहीत नाही, परंतु एखादी छोटीशी जबाबदारीही मिळाली तर मी स्वीकारण्यासाठी तयार आहे. मी अनेक दिवसांपासून युवा खेळाडूंना मदत करत आहे.

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, 'मला जास्तीत जास्त खेळाडूंना मदत करायची आहे.' डिव्हिलियर्सच्या या विधानावरुन हे स्पष्ट होते की, हा दिग्गज आयपीएल किंवा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतील प्रशिक्षकाची भूमिका किंवा सल्लागाराच्या भूमिकेबद्दल विचार करत आहे. डिव्हिलियर्स आयपीएल 2022 मध्ये बेंगळुरुसह सपोर्टिंग स्टाफमध्ये सामील होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com