'मैं आधा भारतीय और आधा साउथ अफ्रीकी'... म्हणत डिव्हिलियर्सने निवृत्तीची केली घोषणा

'मिस्टर 360 डिग्री' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आता मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना दिसणार नाही.
'मैं आधा भारतीय और आधा साउथ अफ्रीकी'... म्हणत डिव्हिलियर्सने निवृत्तीची केली घोषणा
AB de VilliersDainik Gomantak

'मिस्टर 360 डिग्री' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आता मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना दिसणार नाही. एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केल्याने क्रिकेट चाहत्यांना यापुढे अफलातून शॉट्स पाहायला मिळणार नाहीत. 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्त झालेल्या डिव्हिलियर्सने आता T20 लीग (T20 League) क्रिकेटलाही अलविदा केला आहे.

डिव्हिलियर्सने शुक्रवारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. डिव्हिलियर्सने ज्या ट्विटमध्ये निवृत्तीची घोषणा केली ते खूप खास आहे. डिव्हिलियर्सने तीन भाषांमध्ये चाहत्यांचे आभार मानले, त्यापैकी एक हिंदी आहे.

AB de Villiers
एबी डिव्हिलियर्सचा IPL ला ही अलविदा

डिव्हिलियर्सनेही स्वत:ला अर्धे भारतीय असल्याचे सांगितले. डिव्हिलियर्स म्हणाला, 'मी अर्धा भारतीय आणि अर्धा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मी दक्षिण आफ्रिकेत राहीन पण माझ्या हृदयात भारताचे विशेष स्थान आहे. अर्धा भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.

एबी डिव्हिलियर्स 14 वर्षे आयपीएलचा भाग होता. भारतातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले. 2007 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झालेल्या डिव्हिलियर्सने चौथ्या सत्रात आरसीबीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो या संघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करु लागला. डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर म्हणाला- 'मी नेहमी आरसीबीचाच (RCB) राहीन. माझ्यासाठी आरसीबीशी संबंधित प्रत्येकजण कुटुंबासारखा आहे. लोक येत-जात राहतात पण आरसीबीवरील चाहत्यांचे प्रेम कायम राहील. मी अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांत 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता आणि त्याच्या बॅटने 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com