मॅकेसवेल म्हणतोय.. आम्हाला रोहित नसल्याचा फायदा होणार

मॅकेसवेल म्हणतोय.. आम्हाला रोहित नसल्याचा फायदा होणार
The absence of Rohit Sharma in Australia tour in the limited overs series maybe beneficial for us says Glenn Maxwell

सिडनी : मर्यादित षटकांच्या मालिकेत रोहित शर्माची अनुपस्थिती आमच्या पथ्यावर पडू शकेल, परंतु केएल राहुलकडे रोहितची अनुपस्थिती भरून काढण्याची क्षमता आहे, असे मत ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलने व्यक्त केले.

रोहित शर्मा हा फारच उच्च क्षमतेचा फलंदाज आहे. त्याच्याकडे कमालीचे सातत्यही आहे. एकदिवसीय सामन्यांत तीन द्विशतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यामुळे तो भारतीय संघात नसणे हे आमच्यासाठी फायदेशीरच आहे, असे मॅक्‍सवेल म्हणाला. पण राहुलकडे ही पोकळी भरून काढण्याची क्षमता असल्याचेही तो म्हणतो. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये राहुल कर्णधार असलेल्या पंजाब संघात मॅक्‍सवेल राहुलचा साथीदार होता.

मॅक्‍सवेलने भारताचा वेगवान गोलंदाज महम्मद शमीचेही कौतुक केले. शमीसुद्धा आयपीएलमध्ये पंजाब संघाचा सदस्य होता. शमीची क्षमता मी पाहिली आहे. नव्या चेंडूबरोबर तो जुना चेंडूही चांगल्या पद्धतीने टाकू शकतो.

अधिक वाचा : 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com