श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा जाऊ शकते ''या'' खेळाडूकडे?
In the absence of Shreyas Iyer the helm of the Delhi Capitals will go to Yaa

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा जाऊ शकते ''या'' खेळाडूकडे?

नवी दिल्ली: भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 66 धावांनी इंग्लंडला मात दिली. मात्र याच सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर जायबंदी झाला. त्यामुळे तो उर्वरीत दोन एकदिवसीय सामन्याला आणि यंदाच्या आयपीएल हंगामाला  मुकणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा मोठा धक्का बसला मानला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिल्ली संघव्यवस्थापनाकडे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित कर्णधारपदासाठी अनेक पर्याय आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे दिल्ली कॅपिटल्स संघात आहेत. दोघांकडे अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद संभाळण्याचा अनुभव आहे. तसेच भारताचा युवा खेळाडू पृर्थ्वी शॉ आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ हे दोघेही कर्णधारपद संभाळू शकतात. तसेच स्फोटक फलंदाज शिखर धवनकडेही मोठा अनुभव आहे. परंतु इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि दिल्ली कॅपिटल्सचे टीम प्रमोटर्स यासंबंधीचा निर्णय लवकर घेतील. (In the absence of Shreyas Iyer the helm of the Delhi Capitals will go to Yaa)

यंदा 9 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलची सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिला असल्याने लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाबाबतची घोषणा होण्याची शक्यत वर्तवली जात आहे. 30 मे ला आयपीएलचा अंतिम सामना पार पडणार आहे.

दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये य़ष्टिरक्षक श्रेयस अय्यर जायबंदी झाला असून इंग्लंड संघाची फलंदाजी सुरु असताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरेस्टोने मारलेला फटका अडवताना श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. श्रेयसच्या खांद्यावर सर्जरी होणार असल्याचं समजतयं.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com