अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत धक्कादायक बातमी, पूर्व अध्यक्षांना केली अटक

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) माजी अध्यक्षाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Acb Former President
Acb Former PresidentDainik Gomantak

Acb Former President Arrested: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) माजी अध्यक्षाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसीबीच्या पूर्व अध्यक्षांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अझिझुल्ला फाजली यांना सोमवारी अटक करण्यात आली. (Acb Former President Arrested Because Of Fake Letter By Security Officials)

VOA ने काबूल पोलिस मुख्यालयातील एका अज्ञात स्रोताचा हवाला देत सांगितले की, ACB सुरक्षा रक्षकांनी फाजली यांना एसीबीच्या आवारात जाण्यास मनाई करण्यात आली.

Acb Former President
Taliban कब्जानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघ बांग्लादेशमध्ये दाखल

वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन करत फाजली यांना अटक करण्यात आली. त्यांना आत जाण्यापासून रोखण्यासाठी एसीबीच्या रक्षकांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता, ज्यामध्ये फाजली यांना एसीबीच्या आवारात जाण्यास मनाई करण्यात आली होती.

Acb Former President
अफगाणिस्तान क्रिकेट कार्यक्रमांबाबत तालिबानचा फर्मान जारी

अटकेची पुष्टी

दुसरीकडे, सरकारी अधिकार्‍यांनी या घटनेवर औपचारिक भाष्य केलेले नाही, परंतु पोलीस आणि एसीबीच्या सूत्रांनी फाजली यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अनेक क्रिकेटपटूंनी देशातील क्रिकेटच्या (Cricket) भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com