Adam Milne Was Bought By Chennai Super Kings
Adam Milne Was Bought By Chennai Super Kings Dainik Gomantak

IPL 2022 आधीचं धोनीचा करोडपती गोलंदाज आला चर्चेत

आयपीएल 2022 च्या लिलावात त्या गोलंदाजाने त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये ठेवली होती. पंजाब किंग्ज आणि चेन्नईने त्याच्यावर लिलावात बोली लावली खरी मात्र शेवटी CSK ने त्याला खरेदी केले.

आयपीएल 2022 (IPL) सुरू होणार आहे. त्याआधी धोनीचे (mahendra singh dhoni) खेळाडूही फॉर्ममध्ये येऊ लागले आहेत. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ड्वेन ब्राव्हो आणि मोईन अली यांचा फॉर्म पाहायला मिळाला. याच भागात आता न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेचे आणखी एक नाव जोडले गेले आहे, ज्याने देशांतर्गत वनडे टूर्नामेंट फोर्ड ट्रॉफीमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

अवघ्या 7 षटकांच्या गोलंदाजीत त्याने आपली छाप सोडली आहे. त्याच वेळी, त्याने चेन्नई सुपर किंग्जला संदेश दिला आहे की, त्यांनी त्यांच्यासाठी केलेला करार अनावश्यक नाही तर त्यात योग्यता आहे. वेलिंग्टन फायरबर्ड्स आणि सेंट्रल स्टॅग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने याने (Adam Milne) आश्चर्यकारक कामगिरी केली. (Adam Milne Was Bought By Chennai Super Kings)

Adam Milne Was Bought By Chennai Super Kings
साहाला धमकी देणाऱ्या पत्रकारावर भज्जी भडकला, 'रिद्धी तु त्याचे नाव सांग मग...'

या सामन्यात न्युझीलँड (New Zealand) चा खेळाडू अॅडम मिल्ने सेंट्रल स्टॅग्स संघाचा भाग होता. या सामन्यात वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 34 षटकांत 8 गडी गमावून 191 धावा केल्या. वेलिंग्टनचा एक गळी वगळता एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही. सेंट्रल स्टॅग्स कडून अॅडम मिल्ने हा संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

7 ओवर मध्ये घेतले 3 बळी

उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 7 ओवर टाकले आणि 35 धावांत वेलिंग्टन फायरबर्ड्सच्या 3 फलंदाजांना आपले शिकार बनवले. यात एका टॉप ऑर्डर आणि दोन मधल्या फळीतील फलंदाजांचा समावेश होता.

5 च्या इकॉनॉमी रेटने अॅडम मिल्नेच्या या घातक गोलंदाजीचा परिणाम असा झाला की, त्यामुळे निर्माण झालेल्या दबावामुळे वेलिंग्टन फायरबर्ड्सने अवघ्या 45 धावांत 6 विकेट गमावल्या. वेलिंग्टनने 118 ते 163 धावांमध्ये या विकेट गमावल्या.ऋृ

अॅडम मिल्नेच्या संघाने 24.5 ओवर मध्ये जिंकला सामना

वेलिंग्टनने सेंट्रल स्टॅग्ससमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्याने 24.5 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. म्हणजेच अॅडम मिल्नेच्या संघाने हा सामना 2 गडी राखून जिंकला. सेंट्रल स्टॅग्सकडून फलंदाजीत रॉस टेलरचा फॉर्म पुन्हा एकदा पाहायला मिळाला, त्याने शानदार 50 धावा केल्या. मागील सामन्यात त्याने धडाकेबाज शतक झळकावले होते.

अॅडम मिल्न 1.90 कोटी चा खेळाडू

अॅडम मिल्ने आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळणार आहे. त्याने त्याची मूळ किंमत ही 1.50 कोटी रुपये ठेवली होती. पंजाब किंग्ज आणि चेन्नईने त्याच्यावर लिलावात बोली लावली. पण, अखेरीस, तो 1.90 कोटी रुपयांमध्ये पिवळ्या जर्सीच्या संघात सामिल झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com