
Team india: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या नवीन किट प्रायोजकाची (Team India Kit Sponsor) घोषणा करण्यात आली आहे. जर्मन स्पोर्ट्स ब्रँड 'Adidas' टीम इंडियाचा नवीन किट प्रायोजक असेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी सोमवारी, 22 मे रोजी टीम इंडियाच्या नवीन किट प्रायोजकाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक Adidas असेल असे ट्विट त्यांनी केले. Adidas विद्यमान किट प्रायोजक किलर जीन्सची जागा घेईल.
दरम्यान, याची घोषणा करताना जय शाह यांनी ट्विट केले की, 'मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, बीसीसीआयने (BCCI) किट प्रायोजक म्हणून Adidas कंपनीसोबत करार केला आहे. क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स वेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.'
वास्तविक, विद्यमान प्रायोजक किलर जीन्सचा (Killer Jeans) करार 31 मे 2023 रोजी संपेल. किलर जीन्ससोबत किट प्रायोजक म्हणून टीम इंडियाचा (Team India) अल्पकालीन करार होता. आता टीम इंडियाच्या जर्सीवर Adidas चा लोगो दिसणार आहे. किलर जीन्सच्या आधी एमपीएल टीम इंडियासाठी किट प्रायोजक होते.
तसेच, बीसीसीआय आणि एमपीएल यांच्यातील करार 2023 च्या शेवटपर्यंत होता, परंतु कंपनीने हा करार मध्यातच संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर किलर जीन्स टीम इंडियाची किट प्रायोजक बनली. एमपीएल टीम इंडियाला प्रति सामन्यासाठी 65 लाख रुपये आणि तीन वर्षांच्या करारासाठी 9 कोटी रुपये रॉयल्टी देत होते.
दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये टीम इंडिया Adidas लोगो असलेली नवीन जर्सी घालू शकते, असे मानले जात आहे. इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियमवर 7 जून रोजी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.