आदित्य कौशिक गोव्यासाठी ‘स्थानिक’ बनणार

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

जीसीएचे प्रयत्नबीसीसीआयकडून तांत्रिक बाबींना मंजुरी मिळणे आवश्यक

पणजी

आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसमात फलंदाज आदित्य कौशिक याला स्थानिक खेळाडू या नात्याने खेळविण्यास गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रयत्न आहेत. त्यास आवश्यक तांत्रिक बाबींविषयक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मंजुरी आवश्यक आहे.

बीसीसीआयकडून मंजुरी मिळाल्यानंतर आदित्य २०२०-२१ मोसमात गोव्यासाठी स्थानिक खेळाडू असेल. सारं काही योजनेनुसार घडल्यासजीसीएला तिसरा पाहुणा क्रिकेटपटू करारबद्ध करणे शक्य होईल. सध्या कर्नाटकचा अष्टपैलू अमित वर्मा व गुजरातचा यष्टिरक्षक स्मित पटेल हे जीसीएशी पाहुणा क्रिकेटपटू करारांतर्गत संलग्न आहेत. गतमोसमात आदित्य कौशिक गोव्याचा पाहुणा क्रिकेटपटू होतात्यामुळे नियमानुसार गोव्याने तीन पाहुण्या क्रिकेटपटूंची कमाल मर्यादा गाठली आहे. आदित्य स्थानिक क्रिकेटपटू ठरल्यासगोव्यासाठी पाहुण्या क्रिकेटपटूची एक जागा रिक्त होईल.

आदित्य हा दिल्लीचा आहे. २०१४ ते २०१६ या कालावधीत तो दिल्लीकडून सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत ११ सामने खेळला. गतमोसमात त्याने रणजी करंडक आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याकडून पदार्पण केले. विजय हजारे करंडक स्पर्धेत त्याने जोमदार फलंदाजी केली. झारखंडविरुद्ध शतक (११० चेंडूंत ११७ धावा) करताना त्याने स्पर्धेतील ७ सामन्यांत ४७.१४च्या सरासरीने ३३० धावा केल्यामात्र नंतर टी-२० व रणजी स्पर्धेत तो फॉर्म राखू शकला नाही. रणजी प्लेट स्पर्धेत ६ सामन्यात अवघ्या १३८ धावा केल्यानंतर चंडीगडविरुद्धच्या लढतीनंतर आदित्यने स्वतःहून संघाबाहेर जाण्याचा निर्णय जीसीएला कळविला होता. त्यानुसार त्याला वगळण्यात आले होते. रणजी स्पर्धेतील एकमेव अर्धशतक (७३) त्याने बिहारविरुद्ध पाटणा येथे नोंदविले.

 स्थानिक स्पर्धेत प्रतिनिधित्व

दिल्लीकडून संधी मिळत नाही हे पाहून आदित्यने गोव्याकडे मोर्चा वळविला. गोव्यात स्थायिक होत जीसीएच्या प्रीमियर लीग आणि कॉर्पोरेट लीग स्पर्धेत तो गेली काही मोसम सलगपणे खेळला आहे. त्यामुळे गतमोसमात त्याला स्थानिक खेळाडू या नात्याने खेळविण्यासाठी जीसीए इच्छुक होतीपण काही तांत्रिक कारणास्तव आणि कमी वेळ असल्यामुळे स्थानिक खेळाडूबाबतची कागदोपत्री दस्तऐवजांची पूर्तता होऊ शकली नव्हतीअसे जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी सांगितले.

 तिसऱ्या पाहुण्या खेळाडूचा पर्याय

‘‘आगामी मोसमापूर्वी नियोजित वेळेत आम्ही आदित्य कौशिक गोव्यासाठी स्थानिक क्रिकेटपटू असल्याची कागदपत्रे बीसीसीआयला सादर करणार आहोत. तांत्रिक बाबींची पूर्तता होऊनबीसीसीआयने मंजुरी दिल्यानंतर तो आमच्यासाठी स्थानिक खेळाडू असेल. त्यामुळे आमच्यासाठी आगामी मोसमात आणखी एक पाहुणा क्रिकेटपटू करारबद्ध करण्याचा मार्ग मोकळा होईल. आम्हाला पर्याय उपलब्ध होईल,’’ असे विपुल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या