AFC Champions League: एफसी गोवाची बचावपटू सॅनसनला पसंती

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

एफसी गोवा संघाने बचावपटू सॅनसन परेरा याच्या शानदार कामगिरीची दखल घेत त्याला वाढीव करार देण्यास पसंती दर्शविली आहे.

पणजी: एफसी गोवा (AFC Champions League) संघाने बचावपटू सॅनसन परेरा (Sanson Parera) याच्या शानदार कामगिरीची दखल घेत त्याला वाढीव करार देण्यास पसंती दर्शविली आहे. प्राप्त माहितीनुसार, संघाने त्याचा करार आणखी तीन वर्षांसाठी वाढविला आहे.

लेफ्ट बॅक जागी खेळणारा सॅनसन 23 वर्षांचा आहे. साळगावकर एफसी संघातील या नियमित बचावपटूस एफसी गोवाने गतमोसमात (2020-21) करारबद्ध केले. त्याचा मूळ करार 31 मे 2022 पर्यंत होता. प्रशिक्षक हुआन फेरांडो यांना सॅनसनच्या कौशल्यपूर्ण खेळाने प्रभावित केले असून त्यांच्या सुचनेनुसार त्याचा करार आणखी तीन वर्षांनी वाढविण्याचे क्लबने ठरविले आहे. (AFC Champions League FC Goa defender Sanson preferred)

AFC Champions League: मेहनती मार्टिन्सकडून चांगल्या कामगिरीचा फेरांडोंना विश्वास

गत मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत सॅनसन चार सामन्यांत एकूण 152 मिनिटे खेळला. 22 नोव्हेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे बंगळूर एफसीविरुद्ध त्याने आयएसएल पदार्पण केले. सॅनसन प्रतिष्ठेच्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत एफसी गोवातर्फे सर्व सहा सामने खेळला. ई गटात इराणचा पर्सेपोलिस, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा आणि कतारचा अल रय्यान या अनुभवी संघाविरुद्ध सॅनसन बचावफळीत उल्लेखनीय ठरला. सहा लढतीत तो एकूण 467 मिनिटे मैदानावर खेळला.
 

संबंधित बातम्या