AFC Champions League: सेवियरच्या उपयुक्ततेस एफसी गोवाचे प्राधान्य

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

एफसी गोवाने आणखी तीन वर्षांसाठी करार करून त्याच्या उपयुक्ततेस प्राधान्य दिले आहे.

पणजी: एफसी गोवाच्या (FC Goa) बचावफळीत प्रशिक्षक हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांच्या विश्वासास पात्र ठरलेला युवा बचावपटू सेवियर गामा (Savior Gamma)याच्याशी एफसी गोवाने आणखी तीन वर्षांसाठी करार करून त्याच्या उपयुक्ततेस प्राधान्य दिले आहे.

नव्या करारानुसार लेफ्ट-बॅक जागी भरवशाच्या खेळाडू असलेला सेवियर एफसी गोवा संघात 2024 पर्यंत असेल. सेवियरने मागील मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत (football tournament) सातत्यपूर्ण खेळाने छाप पाडली. 2020-21 मोसमात एफसी गोवाने सलग 15 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला, त्यात बचावफळीत 24 वर्षीय सेवियरचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. मोसमात त्याने एक गोल व तीन असिस्टचीही नोंद केली. (AFC Champions League FC Goa prioritizes Saviors usefulness)

AFC Champions League: एफसी गोवाची बचावपटू सॅनसनला पसंती

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघातील सेवियरला 2017 साली सीनियर संघासाठी निवडण्यात आले. 2018-19 मोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने उल्लेखनीय खेळ केला. 2019 मधील सुपर कप विजेत्या एफसी गोवा संघात त्याचा समावेश होता. त्याच मोसमात एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा जिंकली, त्यावेळीही सेवियरने प्रमुख वाटा उचलला.

एफसी गोवाच्या वाढीव करारानंतर सेवियरने सांगितले, की ``माझ्यासाठी हे घर असल्याची प्रामाणिक भावना आहे. गोव्यात असल्यामुळे घर असल्याचे वाटत नाही, तर आज मला खेळाडू बनविण्यात क्लबचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक खेळाडूस हवा असलेला आदर मिळाला. नव्या करारमुळे माझ्या खांद्यावरील जबाबदारी वाढली असून ती निभावण्याचे ध्येय आहे. सध्या तरी मी स्वप्न जगत आहे.``

सेवियरचे कौतुक करताना प्रशिक्षक फेरांडो यांनी सांगितले, की ``शिकण्याप्रती त्याचा दृष्टिकोन विलक्षण आहे आणि त्याचे चांगले दिवस यायचे बाकी आहेत. तो आरामात चेंडूवर नियंत्रण राखतो, त्यामुळे बचावातून मुसंडी मारण्यात त्याला मदत होते. सामन्यातील प्रत्येक सेकंदासाठी झुंजणारा तो लढवय्या आहे. येत्या काही वर्षांत त्याची प्रगती पाहण्यास मी उत्सुक आहे.``

 सेवियर गामाची कारकीर्द

- आयएसएल मोसम ः 2018-19, 2019-20, 2020-21

- आयएसएल ः 34 सामने, 2234 मिनिटे, 2 गोल, 3 असिस्ट

- एएफसी चँपियन्स लीग ः 5 सामने, 161 मिनिटे

संबंधित बातम्या