AFC champions league 2021:गोव्यात पहिल्यांदाच फुटबॉलचे सामने रात्री उशिरा

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

गोव्यात आता रात्री उशिरा फुटबॉल सामने खेळले जाणार आहेत. आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ई गटातील सामने अनुक्रमे रात्री आठ आणि साडेदहा वाजता खेळविण्यास मान्यता मिळाली आहे.

पणजी: गोव्यात आता रात्री उशिरा फुटबॉल सामने खेळले जाणार आहेत. आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ई गटातील सामने अनुक्रमे रात्री आठ आणि साडेदहा वाजता खेळविण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच रात्री उशिरापर्यंत फुटबॉल सामने होतील.

पश्चिम आशियातील क्लब संघात बहुतांश मुस्लिम फुटबॉलपटू असून रमझानच्या उपवासामुळे या संघांनी सामने उशिरा खेळविण्याची विनंती आशियाई फुटबॉल महासंघास (AFC) केली होती. त्या अनुषंगाने एएफसीने पत्र लिहून गोवा फुटबॉल असोसिएशनला (GFA) राज्य प्रशासनाकडून आवश्यक परवानगी घेण्यास सांगितले होते. रात्री उशिरा सामने खेळविण्यास गोवा सरकारने मंजुरी दिल्याची माहिती जीएफएचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिली. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

लोकप्रिय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा येत्या शुक्रवारपासून खेळवण्यात येणार आहे

अगोदरच्या वेळापत्रकानुसार, सामने संध्याकाळी पाच वाजता व रात्री साडेआठ वाजता नियोजित होते, पण उपवासामुळे संध्याकाळी पाच वाजता खेळणे फुटबॉलपटूंना कठीण ठरणारे होते. त्यामुळे सहभागी संघांनी सामन्याची वेळ बदलण्याची विनंती एएफसीला केली होती.

फिफाचा पाकिस्तानला झटका

आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ई गटात इराणचा पर्सेपोलिस, कतारचा अल रय्यान, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा आणि भारताचा एफसी गोवा या चार संघांचा समावेश आहे. द्विसाखळी पद्धतीने सामने 14 ते 30 एप्रिल या कालावधीत खेळले जातील. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्पर्धेतील सामन्यांचे मुख्य केंद्र आहे. देशभरात कोरोना विषाणू महामारीने पुन्हा उग्र रूप धारण केल्यामुळे, तसेच गोव्यातही कोविड-१९ बाधितांचा संख्या वाढत आहे, त्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटातील गोव्यात होणारे सर्व सामने बंद दरवाज्याआड रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्याचे ठरविले आहे.
 

संबंधित बातम्या