AFC Women's Asian Cup: बायचुंग भूतियांनी केले भारतीय महिला फुटबॉलपटूंचे कौतूक

पहिला सामना नेहमीच खडतर असतो हे बायचुंग भूतियांना माहीत आहे, पण संघ ज्या प्रकारे खेळला त्यामुळे ते खूश आहे.
AFC Women's Asian Cup: बायचुंग भूतियांनी केले भारतीय महिला फुटबॉलपटूंचे कौतूक
Bhaichung Bhutia Indian footballerDainik Gomantak

भारतीय महिला फुटबॉल संघाला (Indian women's football team) आशियाई चषक स्पर्धेतील (AFC Women's Asian Cup) सलामीच्या सामन्यात इराणविरुद्ध विजय मिळवता आला नाही, परंतु भारताचा माजी कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू बायचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) यानी भारतीय महिला फुटबॉलपटूंच्या कामगिरीचे कौतुक केले. गुरुवारी हा सामना पाहण्यासाठी भुतिया स्टेडियममध्ये उपस्थित होते. भारतीय संघाचे नशीब अनुकूल नव्हते ज्यामुळे तो जिंकू शकला नाही, असे भुतिया म्हणाले.

Bhaichung Bhutia Indian footballer
U19 World Cup: आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना!

'आमच्या संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. तीन गुण मिळवता न आल्याने अपयशाला तोंड द्यावं लागलं. इराणच्या गोलकीपरनेही जोरदार बचाव केला. भारतीय महिला फुटबॉलने खूप पुढे मजल मारली आहे, असे भारतासाठी 100 हून अधिक सामने खेळलेल्या भुतिया यांनी सांगितले.

Bhaichung Bhutia Indian footballer
SL vs ZIM: झिम्बाब्वेच्या 9 फलंदाजांनी 10 धावांतच श्रीलंकेसमोर पत्करली शरणागती!

पहिला सामना नेहमीच खडतर असतो हे भुतियांना माहीत आहे, पण संघ ज्या प्रकारे खेळला त्यामुळे ते खूश आहेत. भारतीय संघ अतिशय संघटितपणे खेळत होता आणि त्यांनी संपूर्ण सामन्यात गती कायम ठेवली. ते पटकन आपापल्या जागेवर येत होते. प्रशिक्षक थॉमस डेनरबी कौतुकास पात्र आहेत. त्यांनी संघाला दिशा देण्याची अप्रतिम भूमिका साकारली आहे, असे म्हणत त्यांनी भारतीय महिला फुटबॉलपटूंसोबत प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांचेही कौतूक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.