अशरफ घनींसोबत 'हा' क्रिकेटपटू सुद्धा अफगाणिस्तान सोडून पळाला

Afghanistan: स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुल सोडताना अशरफ घनीेसोबत त्यांच्या जवळचे 50 लोक होते, या सर्व लोकांना घेऊन घनी यांनी देश सोडला.
अशरफ घनींसोबत 'हा' क्रिकेटपटू सुद्धा अफगाणिस्तान सोडून पळाला
Afghanistan Along with Ashraf Ghani, this cricketer fled AfghanistanDainik Gomantak

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळविण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांत ते काबुलमध्ये पोहोचले. तालिबानी काबुलमध्ये पोहोचताच अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडून पलायन केले. देश सोडताना त्याच्यासोबत त्यांच्या जवळचे 51 लोक होते. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत अफगाणिस्तानचा एक क्रिकेटपटूदेखील (Cricket News) होता. दरम्यान, आणखी एका खेळाडूने चिंता व्यक्त केली आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यांच्या खेळण्याबाबत आता साशंकता व्यक्त होत आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुल सोडताना त्यांच्या जवळचे 50 लोक होते, या सर्व लोकांना घेऊन घनी यांनी देश सोडला. सुरुवातीला घनी यांचे विमान कुठे उतरल याबद्दल वेगवेगळ्या बातम्या अफवा पसरल्या होत्या. मात्र नंतर या सर्वांना अरब अमिरातीने आश्रय दिल्याचे स्वत: UAE कडून सांगण्यात आले.

Afghanistan Along with Ashraf Ghani, this cricketer fled Afghanistan
तालिबानचे नेते काबुलमध्ये; सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु

देश सोडणाऱ्यांमध्ये क्रिकेटर मोहम्मद नबीचेही नाव

तालिबान काबुलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी सत्ता हातात घेण्यापुर्वीच राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आणि ते अरब अमिरातीमध्ये गेले. यावेळी त्यांच्यासोबत त्याच्या पत्नी रुला घनी आणि सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि क्रिकेटर मोहोम्मद नबी यांचादेखील समावेश होता.

Related Stories

No stories found.