Afghanistan Cricket: 'खेळात राजकारण आणू नकोस' ऑस्ट्रेलियन संघाच्या कॅप्टनला असगर अफगानचे प्रतिउत्तर

ऑस्ट्रेलियन संघाचा (Australian Cricket Team) कसोटी कर्णधार टीम पेन (Tim Paine) अफगाणिस्तान क्रिकेट संघाबद्दल (Afghanistan Cricket Team) केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
Afghanistan Cricket: 'खेळात राजकारण आणू नकोस' ऑस्ट्रेलियन संघाच्या कॅप्टनला असगर अफगानचे प्रतिउत्तर
Afghanistan Cricket: Asghar Afghan answer Tim Paine on his statement Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियन संघाचा (Australian Cricket Team) कसोटी कर्णधार टीम पेन (Tim Paine) अफगाणिस्तान क्रिकेट संघाबद्दल (Afghanistan Cricket Team) केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता पेनच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने (Asghar Afghan) टीम पेनला राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने आयसीसीला (ICC) एका ट्विटच्या माध्यमातून टॅग करून आपला दृष्टिकोन मांडला आहे.(Afghanistan Cricket: Asghar Afghan answer Tim Paine on his statement)

टीम पेनचे वक्तव्य

टीम पेनने 27 नोव्हेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणारा कसोटी सामना रद्द करण्याच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाला योग्य ठरवत म्हटले होते की, तालिबानने महिलांना क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तानसारख्या संघाला आयसीसीची मान्यता असणाऱ्या सामन्यांमध्ये खेळायला कठीण होईल. याशिवाय आगामी टी -20 विश्वचषकात सर्व संघ अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकतात असे त्यांनी म्हटले होते.

असगर अफगानचे प्रतिउत्तर

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण म्हणाला की, टिम पेनने परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय आक्रमक वक्तव्य करू नये.ट्वीट् करत असगर अफगाण याने आयसीसीच्या नियमांनुसार, देशाच्या संघाला आगामी टी -20 विश्वचषकातच नव्हे तर इतर आयसीसी स्पर्धांमध्ये सुद्धा खेळण्याचा अधिकार आहे.असे स्पष्ट केले आहे.

Afghanistan Cricket: Asghar Afghan answer Tim Paine on his statement
Afghanistan क्रिकेटचे भवितव्य धोक्यात, तालिबानकडून महिला संघाला बंदी

दरम्यान अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यापासून देशात अशांततेचे वातावरण आहे.सामान्य जीवनाबरोबरच या देशात खेळांविषयी देखील सतत भीतीचे ढग घोंगावत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे अफगाणिस्तान क्रिकेटचे (Afghanistan Cricket) भविष्य, जे गेल्या दशकात या देशाची ओळख बनले होते.. तालिबानच्या मालकांनी देशाच्या क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असले तरी, संकट कायम आहे.

तालिबाननेस्पष्टपणे म्हटले आहे की, केवळ पुरुषांच्या क्रिकेट संघाला परवानगी देण्यात येईल, पण महिला संघाला नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या नेत्याने म्हटले आहे की, क्रिकेट महिलांसाठी आवश्यक श्रेणीमध्ये येत नाही, त्यामुळे त्याला परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नाही तर तालिबानने देशातील क्रीडा किंवा मनोरंजनाशी संबंधित क्षेत्रात महिलांच्या सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामच्या शरिया कायद्यानुसार स्त्रियांना अशा कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ दिले जाणार नाही. असे मत तालिबानने मांडले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com