Afghanistan क्रिकेटचे भवितव्य धोक्यात, तालिबानकडून महिला संघाला बंदी

तालिबान सरकारच्या निर्णयाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध होणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याची धमकी दिली आहे.
तालिबानने केवळ पुरुषांच्या क्रिकेट संघाला परवानगी देण्यात येईल, पण महिला संघाला नाही.
तालिबानने केवळ पुरुषांच्या क्रिकेट संघाला परवानगी देण्यात येईल, पण महिला संघाला नाही.Dainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यापासून देशात अशांततेचे वातावरण आहे. परदेशी नागरिकांसह, अधिकारी, अनेक अफगाण नागरिकांनीही देश सोडला आहे. आता तेथे तालिबानी राजवटीचे युग सुरू झाले आहे. सामान्य जीवनाबरोबरच या देशात खेळांविषयी देखील सतत भीतीचे ढग घोंगावत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे अफगाणिस्तान क्रिकेटचे (Afghanistan Cricket) भविष्य, जे गेल्या दशकात या देशाची ओळख बनले होते. तालिबानच्या मालकांनी देशाच्या क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असले तरी, संकट कायम आहे. अलीकडील घडामोडींनी त्यास आणखी पुष्टी दिली आहे. तालिबान सरकारच्या निर्णयाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) अफगाणिस्तानविरुद्ध होणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याची धमकी दिली आहे.

तालिबानने केवळ पुरुषांच्या क्रिकेट संघाला परवानगी देण्यात येईल, पण महिला संघाला नाही.
T20 World Cup 2021: कॅप्टन कूल होणार का टीम इंडियाचा प्रशिक्षक?

क्रिकेटला पाठिंबा देण्याविषयी बोलणाऱ्या तालिबानने या प्रकरणात आपले मूळ रुप दाखवत स्पष्टपणे म्हटले आहे की, केवळ पुरुषांच्या क्रिकेट संघाला परवानगी देण्यात येईल, पण महिला संघाला नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या नेत्याने म्हटले आहे की, क्रिकेट महिलांसाठी आवश्यक श्रेणीमध्ये येत नाही, त्यामुळे त्याला परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नाही तर तालिबानने देशातील क्रीडा किंवा मनोरंजनाशी संबंधित क्षेत्रात महिलांच्या सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामच्या शरिया कायद्यानुसार स्त्रियांना अशा कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ दिले जाणार नाही.

तर कसोटी सामना रद्द करण्यावाचून पर्याय नाही

तालिबानच्या या निर्णयापासून देशातील महिलांच्या खेळांमध्ये सहभागी होण्याचे मार्ग सध्या बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेट संघाचे भवितव्यही धोक्यात आले असून, या दिशेने पहिले पाऊल ऑस्ट्रेलियाकडून टाकण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया या वर्षी होबार्टमध्ये अफगाणिस्तानचे यजमानपद भूषवणार होते, पण आता ते रद्द होण्याची शक्यता आहे. सीएने आपल्या निवेदनात स्पष्ट केले, जर अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटला पाठिंबा न देण्याच्या माध्यमांच्या बातम्या खऱ्या असतील, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला होबार्टमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना आयोजित रद्द करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

अफगाणिस्तान संघाचा कसोटी दर्जा जाण्याची शक्यता

अफगाणिस्तानला केवळ 3 वर्षांपूर्वी आयसीसीकडून (ICC) पूर्ण सदस्याचा दर्जा मिळाला. यासह त्यांच्या संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याची परवानगी देखील मिळाली. या संघाने 2018 मध्ये भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, पूर्ण सदस्य देशांनी पुरुष संघ तसेच महिला क्रिकेट संघ तयार करणे आवश्यक आहे. अफगाणिस्तान बोर्डाने गेल्या वर्षीच महिला क्रिकेट संघाला केंद्रीय करार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील महिला क्रिकेटचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते. पण सध्याच्या घडामोडींनंतर, अफगाणिस्तानच्या पुरुष संघाचा कसोटी दर्जा जाण्याचा धोकाही समोर दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com