Afghanistan: क्रिकेटपटू रशीद खानच्या सामन्यातील त्या कृतीमुळे लोक भारावले

सध्या रशीद खान 'द हंड्रेड' स्पर्धा (The Hundred Tournament) खेळत आहे (Afghanistan)
Afghanistan Cricketer Rashid Khan in 'The Hundred' Tournament
Afghanistan Cricketer Rashid Khan in 'The Hundred' Tournament Tweeter

नवी दिल्ली: अफगाणिस्तानचा (Afghanistan) संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात (Under Control of Taliban) गेला आहे. सोशल मीडियावर अफगाणिस्तानमधून येणारे फोटो आणि व्हिडिओज खूप वेदनादायक आहेत. तेथील परिस्थिती फार वाईट आहे आणि आता तालिबानच्या नजरा अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळावर (Afghanistan Cricket Board) पडल्या आहेत. ज्यानंतर लोक अफगाणिस्तान क्रिकेट संघाची स्थिती (Afghanistan Cricket Team) जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु चांगली बातमी अशी आहे की अफगाणिस्तान क्रिकेट संघ त्याच्या वेळापत्रकानुसार क्रिकेट खेळत राहील.

Afghanistan Cricketer Rashid Khan in 'The Hundred' Tournament
Afghanistan Cricketer Rashid Khan in 'The Hundred' TournamentTweeter / Afghanistan Cricket Board

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान लवकरच आयपीएल 2021 चे (IPL 2021) उर्वरित सामने खेळताना दिसणार आहे, पण त्याआधी तो 'द हंड्रेड' स्पर्धा खेळत आहे. दरम्यान, क्रिकेटपटू रशीद खानचा देश अफगाणिस्तान हा तालिबान्यांनी ताब्यात घेतला आहे. तेव्हा 'द हंड्रेड' स्पर्धेतील एक सामना खेळताना रशीद खानने असे काही केले आहे की ज्यामुळे संपूर्ण जग त्याला सलाम करत आहे.

Afghanistan Cricketer Rashid Khan in 'The Hundred' Tournament
अशरफ घनींसोबत 'हा' क्रिकेटपटू सुद्धा अफगाणिस्तान सोडून पळाला

काल रात्री 'द हंड्रेड'च्या एका सामन्यात रशीदचा संघ ट्रेंट रॉकेट्सच्या समोर साऊथर्न ब्रेव्ह संघ होता. हा एलिमिनेटर सामना गमावल्यानंतर त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला खरा, पण रशीदने सर्वांची मने जिंकली. कारण जेव्हा रशीद खान मैदानावर उतरला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अफगाणिस्तानचा झेंडा होता (Afghanistan flag on Rashid Khan's face). आणि त्याने आपल्या देशाला पाठिंबा देत संपूर्ण जगासमोर देशभक्ती (Patriotism) दाखवली.

Afghanistan Cricketer Rashid Khan in 'The Hundred' Tournament
Goa: शिवोलीत दर्जेदार फुटबॉल मैदानाची गरज: मंत्री मायकल लोबो

क्रिकेटला आता तालिबानचा धोका आहे

अलीकडेच, माजी मीडिया व्यवस्थापक आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे पत्रकार इब्राहिम मोमंद यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बंदुकांनी सज्ज असलेले तालिबान एका हॉलमध्ये दिसत आहेत. हे हॉल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय आहे. हा फोटो शेअर करताना खुद्द इब्राहिम मोमंदने ही माहिती लोकांना दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com