AFG vs PAK: हरिस रौफच्या झंझावातापुढे अफगाणिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला, 5 फलंदाज शून्यावर...

AFG vs PAK: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 142 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
Haris Rauf
Haris RaufDainik Gomantak

AFG vs PAK: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 142 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

श्रीलंकेतील हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून 47.1 षटकात 10 गडी गमावून 201 धावा केल्या, प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा 59 धावांवरच गारद झाला. अशा प्रकारे पाकिस्तानने 142 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

अफगाणिस्तानच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही

दरम्यान, 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने तिसर्‍याच षटकात इब्राहिम झद्रानच्या रुपाने पहिली विकेट गमावली.

इब्राहिमला 6 चेंडूत खातेही उघडता आले नाही. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने 18 धावा केल्या. आश्‍चर्याची बाब म्हणजे चार फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. तर 5 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.

Haris Rauf
AFG Vs PAK: अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने गमावली T20 सीरीज, शादाब म्हणाला- 'देशासाठी...'

अफगाणिस्तानच्या संघाची स्थिती

रहमानउल्ला गुरबाज - 18 धावा

इब्राहिम जादरान-0

रहमत शाह-0

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार)-0

इकराम अलीखिल-4

मोहम्मद नबी-7

अजमतुल्ला उमरझाई - 16

राशिद खान-0

अब्दुल रहमान-2

मुजीब उर रहमान-4

फजलहक फारुकी-0

पाकिस्तानच्या विजयाचा नायक

दुसरीकडे, या सामन्यात वेगवान गोलंदाज हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि इमाम-उल-हक यांनी पाकिस्तानसाठी अप्रतिम कामगिरी केली.

हे चारही खेळाडू पाकिस्तानच्या (Pakistan) विजयाचे 'हिरो' ठरले. इमामने 94 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्याशिवाय शादाब खानने 39, तर इफ्तिखारने 30 धावा केल्या. मात्र, बाबर आझम शून्यावर बाद झाला.

Haris Rauf
AFG vs PAK: अफगाणिस्तानने पाकिस्तानला T20I मॅचमध्ये चारली पराभवाची धूळ! आता मिशन व्हाईटवॉश

हरिस रौफने 5 विकेट घेतल्या, सामनावीर ठरला

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) तुफानी गोलंदाजी केली. त्याने 6.2 षटकात 18 धावा देत 5 बळी घेतले.

विशेष म्हणजे, त्याने 2 षटके मेडनही टाकली. रौफच्या झंझावातापुढे अफगाणिस्तानचा एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.

Haris Rauf
BAN vs AFG: रहमानउल्लाह-इब्राहिम जोडीने रचला इतिहास, अफगाणिस्तानसाठी नोंदवली सर्वात मोठी भागीदारी

शाहीन-नसीमनेही शानदार गोलंदाजी केली

शाहीन आफ्रिदीनेही धुमाकूळ घातला. त्याने 4 षटकात 9 धावा देत 2 बळी घेतले. त्याने 2 ओव्हर मेडन्सही टाकल्या.

याशिवाय नसीम शाहने 5 षटकात 12 धावा देत 1 बळी घेतला. पाकिस्तानच्या या सामन्यात शादाब खानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीचा अप्रतिम झेलही घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com