Neeraj Chopra: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला मोठा धक्का

AFI ने नीरजच्या प्रशिक्षकाला केले निलंबित
Neeraj Chopra: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला मोठा धक्का
Neeraj Chopra with Coach Uve HonnDainik Gomantak

Neeraj Chopra: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय एथलेटिक्स महासंघाकडून (AFI) मोठा धक्का बसला आहे. नीरजचे परदेशी प्रशिक्षक उवे हॉन यांना निलंबित करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे प्रशिक्षक उवे हॉन यांनी AFI समोर अनेक मागण्या केल्या होत्या. यामध्ये 50% पगार वाढीपासून ते पगारात कर सवलत तसेच विमानात प्रवास करण्यासाठी प्रथम श्रेणी तिकिटांची मागणी समाविष्ट आहे. तथापि, एएफआयचे म्हणणे आहे की, होनला काढून टाकले आहे, कारण महासंघ त्याच्या कामावर समाधानी नव्हता.

Neeraj Chopra with Coach Uve Honn
Lasith Malinga: श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा T20 क्रिकेटमधून निवृत्त

वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, फेडरेशनने एक निवेदन जारी केले आहे की एएफआय त्यांच्या कामावर समाधानी नाही आणि लवकरच दोन नवीन परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाईल. 59 वर्षीय होनचा करार फक्त टोकियो ऑलिम्पिकपर्यंत होता. एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, “आम्ही दोन नवीन प्रशिक्षक आणत आहोत आणि उवे हॉनची जागा घेत आहोत कारण आम्ही त्याच्या कामावर समाधानी नाही. आम्ही शॉटपुट खेळाडू तेजिंदरपाल सिंग तूर साठी देखील परदेशी प्रशिक्षक शोधत आहोत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com