पी. व्ही. सिंधूने निर्णय बदलला; थॉमस-उबर कप खेळणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने आपला निर्णय बदलला असून ३ ते ११ ऑक्‍टोबरदरम्यान डेन्मार्क येथे होणाऱ्या थॉमस आणि उबर करंडक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने आपला निर्णय बदलला असून ३ ते ११ ऑक्‍टोबरदरम्यान डेन्मार्क येथे होणाऱ्या थॉमस आणि उबर करंडक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

घरगुती कार्यक्रमामुळे सिंधूने या स्पर्धेतून अगोदर माघार घेतली होती; परंतु भारतीय बॅडमिंटन संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सिंधूला विनंती केली. त्यांचा मान राखून सिंधूने स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत आपल्याला चांगला ड्रॉ मिळाला असून विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे तू स्पर्धेत खेळावे, अशी विनंती मी सिंधूला केली होती, असे बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा यांनी सांगितले. सिंधूने आपल्या घरचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे, असेही शर्मा म्हणाले. सिंधूला डेन्मार्कमध्ये ३० सप्टेंबर रोजी वैयक्तिक प्रवास करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

सायना नेहवालकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच सायना व्यतिरिक्त साई प्रणीत आणि किदम्बी श्रीकांत या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. परुपल्ली कश्‍यप आणि युवा खेळाडू लक्ष्य सेनही यंदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. शिवाय दुहेरीत मनु अत्री आणि सुमीत रेड्डी हे  भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 
 

संबंधित बातम्या