INDvsENG : दारुण पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला डिवचलं; केलं हिंदीत ट्विट!

INDvsENG : दारुण पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला डिवचलं; केलं हिंदीत ट्विट!
Copy of Gomantak Banner - 2021-02-09T200507.556.jpg

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. आणि त्याचबरोबर पाहुण्या इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 - 0 अशी आघाडी मिळवली आहे. तर या विजयानंतर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने सोशल मीडियाच्या ट्विटरवरून हिंदीमध्ये ट्विट करत टीम इंडियाला आणि चाहत्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवल्यानंतर केव्हिन पीटरसनने सोशल मीडियावरील ट्विटर वरून हिंदीत ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये केव्हिन पीटरसनने, टीम इंडियाला उद्देशून ''इंडिया, तुम्हाला लक्षात आहे जेंव्हा मी तुम्हाला अगोदरच चेतावणी दिली होती की ऑस्ट्रेलियाच्या संघाला नमवून आल्यानंतर जास्त उत्सव साजरा करू नका,'' असे म्हटले आहे. केव्हिन पीटरसनने भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिलेली आहे. याशिवाय पीटरसनची भारतात सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. आणि यापूर्वी देखील त्याने आपले काही ट्विट हिंदीत केल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर केव्हिन पीटरसनने हिंदीत केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या काळानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. आणि याठिकाणी भारतीय संघाने कांगारूंना चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2 - 1 ने पराभूत करत मालिका जिंकली होती. भारतीय संघाला अ‍ॅडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. त्यानंतर सिडनीतील सामना अनिर्णित ठरला. आणि चौथ्या आणि शेवटच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली होती.          

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com