बाद झाल्यांनतर मैदान सोडताच कोहलीने आपटली बॅट; पहा video

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी सनरायझर्स हैदराबादचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरूचा विजय असूनही कर्णधार विराट कोहली आपल्या कामगिरीवर खूष दिसला नाही.

आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी सनरायझर्स हैदराबादचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरूचा विजय असूनही कर्णधार विराट कोहली आपल्या कामगिरीवर खूष दिसला नाही. सामन्याच्या सुरूवातीला विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण  33 धावा केल्यावर तो जेसन होल्डरच्या चेंडूवर बाद झाला. बाहेर जेव्हा तो आरसीबी डगआऊटजवळ आला तेव्हा त्याने रागाने खुर्चीवर जोरदार बॅटवर मारली. कोहलीची अशी वागणूक पाहून त्याचे सहकारी देखील आश्चर्यचकित झाले. तत्पूर्वी, विराटने या सामन्यात 33 धावा केल्या होत्या. (After leaving the field, Kohli hit the bat)

PL 2021 RR vs DC: आज राजस्थान विरुद्ध दिल्ली; दोन युवा कप्तान करणार नेतृत्व

कोहलीचा विचित्र योगायोग
विराटने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत 33 धावा केल्या आणि त्याच्या खेळीत त्याने  4 चौकार ठोकले. कोहली जेसन होल्डरच्या चेंडूवर  झेलबाद झाला. हा योगायोग कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या  पहिल्या सामन्यात देखील त्याने 29 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराहने त्याला एलबीडब्ल्यू बाद केले होते.

रोमांचक सामन्यात आरसीबीचा विजय
बंगळुरुने हंगामातील सहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळविला. चेन्नईच्या चेपॅक स्टेडियम  झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने  20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 133 धावा करू शकला. शेवटच्या 4 षटकांत एसआरएचला 35 धावांची आवश्यकता होती. परंतु एसआरएचचा संघ केवळ 28 धावा करू शकला.

 

दरम्यान, विराट कोहलीला रन मशीन सोबत 'अँग्री यंग मॅन' म्हणून देखील ओळखले जाते. इथून मागे पण विराट कोहलीने बाद झाल्यांनतर राग व्यक्त केला होता. विराटच्या आरसीबीने या हंगामातील दोन्हीही सामने जिंकले आहेत. आरसीबीने पहिल्याच सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सला हरवले होते. दोन विजयानंतर आरसीबीचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या 10 एप्रिलला आरसीबीचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स सोबत आहे. 

संबंधित बातम्या