IND vs NZ: संघ कोलकत्यात पोहोचताच राहुल द्रविड ने धरला ईडन गार्डनचा रस्ता

कोलकाता (Kolkata) येथे पोहोचल्यावर राहुल द्रविड (Rahul Dravid) हे खेळाडूंसोबत ते हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरून थेट ईडन गार्डनवर पोहोचले.
IND vs NZ: संघ कोलकत्यात पोहोचताच राहुल द्रविड ने धरला ईडन गार्डनचा रस्ता
राहुल द्रविड (Rahul Dravid) हे खेळाडूंसोबत ते हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरून थेट ईडन गार्डनवर पोहोचले.Dainik Gomantak

टीम इंडियाचे (Team India) नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) तिसऱ्या आणि शेवटच्या T20 साठी कोलकाता (Kolkata) येथे पोहोचल्यावर राहुल द्रविड हे खेळाडूंसोबत ते हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरून थेट ईडन गार्डनवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathore) आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरेही होते. न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) 3 टी-20 मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने मालिका काबीज केली आहे. आता कोलकातामध्ये न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याची तयारी सुरू आहे. यासाठी दोन्ही संघ शनिवारी कोलकाता येथे पोहोचले. ईडन गार्डनवर खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20च्या तयारीसाठी संघांना वेळ मिळाला नाही. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 मध्ये फक्त 1 दिवसाचे अंतर होते, ज्यामध्ये दोन्ही संघ रांचीहून कोलकाता येथे पोहोचले.

राहुल द्रविड (Rahul Dravid) हे खेळाडूंसोबत ते हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरून थेट ईडन गार्डनवर पोहोचले.
IND vs NZ: न्यूझीलंडला नमवण्यासाठी संघांत 'यांची' एन्ट्री तर काहींना विश्रांती

द्रविडने खेळपट्टीचा घेतला आढावा

संघ कोलकात्यात पोहोचले आहेत. कोचिंग स्टाफही टीमसोबत पोहोचले. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकासोबत टीम हॉटेलमध्ये जाण्याऐवजी थेट ईडन गार्डन्सवर गेले, जिथे द्रविड यांनी प्रथम तिथल्या खेळपट्टीचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्याशी बोलून खेळपट्टी विषयी जाणून घेतले. यावेळी द्रविडने स्वत: खेळपट्टी पाहिली.

राहुल द्रविड (Rahul Dravid) हे खेळाडूंसोबत ते हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरून थेट ईडन गार्डनवर पोहोचले.
IND vs NZ: टीम इंडिया व्हाईट वॉश साठी सज्ज !

मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड ईडन गार्डन्सवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, ईडन गार्डनमधील त्याची आठवण 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या कसोटीशी संबंधित आहे. ज्याने कांगारूंचा विजय रथ रोखण्याचे काम केले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसर्‍या आणि अंतिम T20 साठी, 70 टक्के प्रेक्षकांना ईडन गार्डन्सवर परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com