न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला हरवले पण भारतीय संघावर संकट का आले?

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

न्यूझीलंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन क्रिकेट कसोटींच्या मालिकेत २-० असे धवल यश मिळवले आणि जागतिक कसोटी विजेतेपदाच्या शर्यतीत रंगत आणली.

हॅमिल्टन- न्यूझीलंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन क्रिकेट कसोटींच्या मालिकेत २-० असे धवल यश मिळवले आणि जागतिक कसोटी विजेतेपदाच्या शर्यतीत रंगत आणली. या यशामुळे न्यूझीलंडने जागतिक कसोटी विजेतेपदाच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवत भारतावर दडपण आणले. भारताला आगामी दोन मालिकांत आता चांगली कामगिरी केल्यासच जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम लढतीत खेळता येईल. 
न्यूझीलंडने वेस्ट इंडीजविरुद्ध २-० असे यश मिळवले आहे. आता त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतही २-० बाजी मारली, तर त्यांचे एकूण नामांकन गुण ४२० होतील. ते पाच मालिका खेळले आहेत.  

भारतासमोरील लक्ष्य

भारताचे ४ मालिकांतून ३६० गुण

 भारतास न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी ५०४ गुणांची गरज आहे. 

भारतास उर्वरित ८ कसोटीतून ७० टक्के गुण मिळवण्याची गरज 

 प्रत्येक कसोटी विजयासाठी ३० गुण तर अनिर्णीत सामन्यासाठी १० गुण

भारतास पाच कसोटी विजय अथवा चार विजय आणि तीन अनिर्णीतची गरज

काय आहेत शक्यता?

ऑस्ट्रेलिया ८२.२ टक्के गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.  भारताविरुद्धची मालिका २-२ बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया  ७४.१७ गुणांसह अव्वल राहतील. ऑस्ट्रेलियाने मालिका १-२ गमावल्यास त्यांचे ७० टक्के गुणच होतील. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दोनही कसोटी जिंकल्यास त्यांचे सरासरी गुण ७० होतील.
 

संबंधित बातम्या