
South Africa New T20 Captain: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघही वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
या मालिकेदरम्यान, दक्षिण आफ्रिकेने आपल्या T20 संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. एका 28 वर्षीय खेळाडूकडे दक्षिण आफ्रिकेच्या T20 संघाची कमान सोपवण्यात आली आहे. हा खेळाडू इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्येही कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने टेम्बा बावुमाच्या जागी 28 वर्षीय एडन मार्करामला टी-20 संघाचे कर्णधारपद दिले आहे. टेंबा बावुमाने गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
2014 मध्ये आयसीसी अंडर 19 विश्व क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिका अंडर 19 संघाचे जेतेपद पटकावणारे मार्कराम आता वरिष्ठ संघाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.
एडन मार्करामने अलीकडेच सनरायझर्स इस्टर्न केपसह SA 20 मध्ये कर्णधार म्हणून विजेतेपदाची चव चाखली.
IPL 2023 (IPL 2023) साठी, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एडन मार्कराम याची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार केन विल्यमसन सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे फ्रँचायझीने केन विल्यमसनला यावर्षी संघातून वगळले आहे.
आयपीएल 2022 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने एडन मार्करामला खरेदी करण्यासाठी 2.6 कोटी रुपये दिले. त्या आयपीएल 2022 हंगामात, एडन मार्करामने 12 डावांमध्ये 139.05 च्या स्ट्राइक रेटने आणि 47.62 च्या सरासरीने 381 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्करामने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने 527 धावा केल्या आहेत. मार्करामची सरासरी 40.54 होती तर स्ट्राइक रेट 134.10 होता. एडन मार्करामनेही एक विकेट घेतली आहे.
दुसरीकडे, एडन मार्करामच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तो आयपीएलमध्ये दोन सीझन खेळला आहे. एडन मार्करामने आयपीएल 2021 मध्ये 6 सामन्यात 146 धावा केल्या. आयपीएल 2022 मध्ये देखील एडन मार्करामने 14 सामन्यात 381 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकेही झळकावली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.