एटीके मोहन बागानसाठी आयती संधी फक्त एक विजय नोंदविलेल्या तळाच्या मोहन बागानविरुद्ध लढत

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

ओडिशा एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी खूपच खराब आहे.

पणजी ःओडिशा एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी खूपच खराब आहे. फक्त एक विजय नोंदविलेल्या संघाविरुद्ध एटीके मोहन बागानला आयती संधी असेल. अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाल्यास त्यांचे दुसरे स्थान भक्कम होईल.

ओडिशा एफसी व एटीके मोहन बागान यांच्यातील सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर शनिवारी (ता. 6) खेळला जाईल. एटीके मोहन बागानचे सध्या 14 लढतीतून 27 गुण आहेत. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीचे त्यांच्यापेक्षा सहा गुण जास्त आहेत. स्पर्धेत तब्बल आठ पराभव स्वीकारलेला ओडिशा संघ आठ गुणांसह शेवटच्या अकराव्या क्रमांकावर आहे. ब्रिटिश प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांची आक्षेपार्ह प्रतिक्रियेमुळे हकालपट्टी केल्यानंतर भुवनेश्वरस्थित संघाचा पहिलाच सामना असेल. जेराल्ड पेटॉन हे आता संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक आहेत.

ISL2020-21 एफसी गोवास दोन वेळा पिछाडीवरून बरोबरीत रोखले

ओडिशा एफसीने 21 गोल स्वीकारले आहेत, तर फक्त 13 गोल नोंदविले आहेत. मागील पाच सामने हा संघ विजयाविना आहे. अगोदरच्या लढतीत त्यांना जमशेदपूर एफसीने एका गोलने हरविले होते. एकंदरीत एटीके मोहन बागानचे पारडे शनिवारी जड असेल. मागील लढतीत त्यांनी शेवटच्या 31 मिनिटांच्या खेळात तीन गोल नोंदवून दोन गोलांच्या पिछाडीवरून केरळा ब्लास्टर्सला हरविले होते. ओडिशाविरुद्ध विजय नोंदवून प्ले-ऑफ फेरीच्या आणखी एक पाऊल टाकण्यावर त्यांचा भर राहील. निलंबनामुळे ओडिशाचा स्टीवन टेलर आणि एटीके मोहन बागानचा कार्ल मॅकह्यूज खेळू शकणार नाही. एफसी गोवाकडून आलेला नवा करारबद्ध खेळाडू लेनी रॉड्रिग्ज कोलकात्यातील संघातर्फे मैदानात उतरू शकतो.

 

दृष्टिक्षेपात...

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे एटीके मोहन बागानची ओडिशावर 1-0 फरकाने मात

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जच्या 8 क्लीन शीट्स

-ओडिशाची 14 लढतीत फक्त 1 क्लीन शीट

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे 9, तर ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोचे 7 गोल
 

संबंधित बातम्या