
Ajinkya Rahane: भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे आता तो काउंटी क्रिेकेट खेळताना दिसणार आहे. 2023 हंगामासाठी तो लिसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळणार असल्याची माहिती क्लबने दिली आहे.
त्याने या संघाबरोबर करार केला असून आता तो आयपीएल 2023 हंगामानंतर जूनमध्ये या संघाशी जोडला जाईल. तो साधारण 8 काउंटी सामन्यांसाठी, त्याचबरोबर ऑगस्टमध्ये होणाऱ्या रॉयल लंडन कप या अ दर्जाच्या स्पर्धेसाठी उपलब्ध असेल. लिसेस्टरशायरने रहाणेआधी विआन मल्डर आणि नवीन उल हक या परदेशी खेळाडूंबरोबरही करार केला आहे.
रहाणे यापूर्वी काउंटी क्रिकेटमध्ये 2019 साली खेळला आहे. त्यावेळी तो हम्पशायर क्लबकडून खेळला होता. रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला अगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झालेल्या भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
त्याचमुळे आता त्याला भारतीय संघात पुनरागमन करायचे झाल्यास त्याची लय आणि तंदुरुस्ती पुन्हा सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी त्याच्यासाठी काउंटी क्रिकेटमधील कामगिरी महत्त्वाची ठरू शकते.
(Ajinkya Rahane play for Leicestershire County Cricket Club for 2023 season)
दरम्यान लिसेस्टरशायरकडून खेळण्याबाबत रहाणे म्हणाला, 'लिसेस्टरशायरमध्ये सामील होऊन आनंद होत आहे. मी माझ्या नव्या संघसहकाऱ्यांबरोबर खेळण्यास आणि लिसेस्टर शहराचा आनंद घेण्यास उत्सुक आहे.'
दरम्यान, रहाणे यंदा काउंटी क्रिकेटपूर्वी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसले. त्यानंतर तो इंग्लंडला जाईल.
रहाणेने आत्तापर्यत कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतकांसह 38.52 च्या सरासरीसह 4931 धावा केल्या आहेत. तसेच त्याने वनडेमध्ये 35,26 च्या सरासरीने 2962 धावा केल्या आहेत.
गेल्या हंगामात काउंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि उमेश यादव हे भारतीय खेळाडू खेळले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.