INDvsENG 3rd Day1 : अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अडचणीत 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. हा सामना डे नाईट खेळवण्यात येत असून, या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 48.4 षटकांत 112 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिला दिवस संपला त्यावेळी तीन गडी गमावत 99 धावा केलेल्या आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा 57 धावांवर आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या मोटेरा मधील नरेंद्र मोदी या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर चालू झाला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय इंग्लंडच्या संघाचा चांगलाच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. कारण सलामीवीर डॉम सिब्लेला वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शून्य धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर अहमदाबादच्याच अक्षर पटेलने टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. अक्षर पटेलने जॉनी बेअरस्टोला खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. त्यामुळे इंग्लंडचा संघ सुरवातीलाच अडखळला. 

मात्र यावेळेस सलामीवीर जॅक क्रोलीने 84 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. जॅक क्रोली 53 धावांवर असताना अक्षर पटेलने त्याला पायचीत केले. त्यानंतर कर्णधार जो रूटला रविचंद्रन अश्विनने पायचीत केले. जो रूट 17 धावांवर असताना बाद झाला. तर पाचवी विकेट टीम इंडियाला अश्विनने मिळवून दिली. ओली पोपला त्याने 1 धावांवर बाद केले. ओली पोप पाठोपाठ बेन स्टोक्स देखील लवकर बाद झाला. त्याला अक्षर पटेलने फक्त 6 धावांवर पायचीत केले. त्यामुळे सुरवातीचे इंग्लंड संघाचे फलंदाज सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्याच डावात स्वस्तात बाद झाल्याचे पाहायला मिळाले. 

यानंतर, अक्षर पटेलने जोफ्रा आर्चरला बाद करून चौथी विकेट मिळवली. त्यानंतर आठवी विकेट अश्विनने टीम इंडियाला घेऊन दिली. त्याने जॅक लीचला अवघ्या तीन धावांवर चेतेश्वर पुजाराकडे झेलबाद केले. तर स्टुअर्ट ब्रॉडला सुद्धा अक्षर पटेलने बाद केले. आणि बऱ्याच वेळ मैदानावर टिकलेल्या बेन फॉक्सला देखील अक्षर पटेलने 12 धावांवर रोखले. त्यामुळे गोलंदाजी करताना अक्षर पटेलने सर्वाधिक सहा बळी टिपले. फिरकीपटू अश्विनने तीन आणि इशांत शर्माने एक विकेट मिळवली. 

पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 112 धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यानंतर भारतीय संघाला पहिला झटका 33 धावांवर बसला. शुभमन गिल 11 धावांवर असताना त्याला जोफ्रा आर्चरने झेलबाद केले. त्यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला. जॅक लीचने पुजाराला खातेही खोलू दिले नाही. तो पायचीत झाला. तर तिसरी विकेट देखील जॅक लीचनेच घेतली. त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला 27 धावांवर बाद केले. मात्र यावेळेस सलामीवीर रोहित शर्माने पुन्हा एकदा मैदानात पाय रोवत अर्धशतक लगावले. त्याने 82 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांच्या मदतीने 57 धावा केलेल्या आहेत. व अजिंक्य रहाणे एक धावांवर खेळत आहे.          

संबंधित बातम्या