Olympics: भारतीय संघापासून जपानवासीयांना धोका

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

जपानने भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातल्यास ऑलिंपिकला जाणारे भारतीय क्रीडापटू अन्य देशातून ऑलिंपिकला जातील, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

टोकीयो: ऑलिंपिक(Olympics) स्पर्धेसाठी येणाऱ्या भारतीय(Indian), ब्रिटन(Britain) तसेच दक्षिण आफ्रिकेच्या(South Africa) पथकातील सदस्यांपासून जपानवासीयांचे संरक्षण करणे जवळपास अशक्य असेल असे सांगत जपानमधील(Japan) विरोधी पक्षाचे नेते युकिओ एदानो(Yukio Edano) यांनी स्पर्धा संयोजनास विरोध केला. ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक संयोजनामुळे जपानमधील आरोग्याचा प्रश्न जास्त गंभीर होईल. ब्रिटन, भारत, तसेच दक्षिण आफ्रिकेतील पथकाच्या सदस्यांपासून कोरोनाची(Corona) होणारी लागण खूपच तीव्र असेल, असा दावा त्यांनी केला. भारतीय पथकामुळे कोरोनाच्या बी एक - 717 याची लागण होईल. त्याचा प्रसार वेगाने होतो, तसेच तो जास्त प्रभावी आहे. ब्रिटन तसेच भारतात आढळणाऱ्या या विषाणूमुळेच भारतातील रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, असेही ते म्हणाले.(All players going to the Olympics have been vaccinated)

युवा कुस्तीपटूच्या खून प्रकरणात ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार!

तर भारतीय स्पर्धक अन्य देशातून
जपानने भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातल्यास ऑलिंपिकला जाणारे भारतीय क्रीडापटू अन्य देशातून ऑलिंपिकला जातील, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले. आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या संपर्कात आहोत, त्यांच्या सूचनांचे पालन करीत आहोत.

Corona Vaccine: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली कोरोना लस

ऑलिंपिकला जाणाऱ्या सर्व खेळाडूंचे लसीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. जपानने प्रवास बंदी न घातलेल्या देशांत स्पर्धेपूर्वी आमचे खेळाडू एक महिना सराव करतील आणि ते स्पर्धेसाठी जातील, असे बत्रा यांनी सांगितले. त्यांनी नेमबाजी संघ ऑलिपिकपूर्वी तीन महिने झॅग्रेबला सराव करणार आहे याकडे लक्ष वेधले.

संबंधित बातम्या