अष्टपैलू दर्शनची कर्णधारपदास साजेशी खेळी; एमसीसी संघाच्या यशात गोलंदाजांची व फलंदाजांची छाप

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 एप्रिल 2021

जीसीए अकादमी मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत दर्शनची गोलंदाजी आणि फलंदाजीतील शानदार कामगिरी निर्णायक ठरली.

पणजी: दर्शन मिसाळ याने कर्णधारपदास साजेशी खेळी करताना शानदार अष्टपैलू कामगिरी बजावली, त्या बळावर आल्कॉन एमसीसी संघाने काणकोणच्या मांडवी परिवार संघावर पाच विकेटने विजय नोंदवून युवा द गोवा संस्थेच्या मनोहर पर्रीकर टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत दर्शनची गोलंदाजी आणि फलंदाजीतील शानदार कामगिरी निर्णायक ठरली. उपांत्य लढतीत खोर्ली इलेव्हनविरुद्ध शानदार 82 धावा केलेल्या दर्शनने तोच फॉर्म अंतिम लढतीतही कायम राखला. त्याने नाबाद 53 धावा करताना शुभम देसाई याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 52 धावांची अभेद्य भागीदारी केली, त्यामुळे एमसीसी संघाने 5 बाद 119 धावा करून मनोहर पर्रीकर करंडकावर नाव कोरले. त्यापूर्वी मांडवी परिवारला 116 धावांत गुंडाळताना दर्शन, तसेच श्रेयस उसगावकर व निहाल सुर्लकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.(All round visionary captaincy matching Impression of bowling and batting in the success of MCC team)

एएफसी चँपियन्स लीगमधील ऐतिहासिक गुणानंतर अल वाहदाविरुद्ध लढत

स्पर्धेचे बक्षीस वितरण गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, एस्मिराल्डा ग्रुपचे मनोज गवळी, पिळर्ण क्रिकेट क्लबचे अध्यक्ष संदीप राऊत, गोव्याचे माजी रणजीपटू सगुण कामत व सौरभ बांदेकर, युवा द गोवाचे अध्यक्ष भावेश जांबावलीकर, खजिनदार पलाश भेंब्रे, सचिव उन्नती रायकर  यांच्या उपस्थितीत झाले.

संक्षिप्त धावफलक:

 मांडवी परिवार ः 19.3 षटकांत सर्व बाद 116 (स्नेहल कवठणकर 40 - 37 चेंडू, 5 चौकार, कश्यप बखले 28, दीपराज गावकर 15, दर्शन मिसाळ 2-21, श्रेयस उसगावकर 2-35, निहाल सुर्लकर 2-11, सोमेश प्रभुदेसाई 1-18) पराभूत वि. एमसीसी ः 18.2 षटकांत 5 बाद 119 (सूरज डोंगरे 14, कौशल हट्टंगडी 17, दर्शन मिसाळ नाबाद 53 - 27 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, शुभम देसाई नाबाद 16, दीपराज गावकर 2-18, शेरबहादूर यादव 2-30, आविष्कार मोने 1-14.

वैयक्तिक बक्षिसे:

उत्कृष्ट फलंदाज:

आदित्य कौशिक (खोर्ली इलेव्हन, 267 धावा), उत्कृष्ट गोलंदाज ः शेरबहादूर यादव (मांडवी परिवार, 11 विकेट), उदयोन्मुख खेळाडू ः श्रेयस उसगावकर (एमसीसी), स्पर्धेचा मानकरी ः दीपराज गावकर (मांडवी परिवार, 4 सामने, 126 धावा, 7 विकेट), अंतिम सामन्याचा मानकरी ः दर्शन मिसाळ (एमसीसी, 2-21 व नाबाद 53).

 

संबंधित बातम्या