Alyssa Healy ने मोडला 'माही भाई'चा World Record, 'T20 मध्ये अशी कामगिरी...'

Commonwealth Games 2022: भारताकडून 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एका वेळी 100 धावांपर्यंत सहा विकेट गमावल्या होत्या.
Alyssa Healy
Alyssa HealyDainik Gomantak

Commonwealth Games 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाला 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एका वेळी 100 धावांपर्यंत सहा विकेट गमावल्या होत्या. मात्र अ‍ॅशले गार्डनरने 52 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात यष्टिरक्षक अ‍ॅलिसा हिलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नवा इतिहास रचला.

दरम्यान, हीलीने भारताच्या (India) डावात दोन झेल घेतले. तिने भारतीय सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांचे झेल घेतले. यानंतर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेटमागे 100 बळी घेणारा हीली पहिली यष्टिरक्षक (पुरुष आणि महिला) ठरली आहे. हीलीने महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) विश्वविक्रमाला मागे टाकले आहे. याआधी धोनीचे विकेटमागे 91 बळी होते, तर हिलीचे आता 101 बळी झाले आहेत.

Alyssa Healy
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज नव्या लूकमध्ये

तसेच, इंग्लंड (England) महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक सारा टेलर 74 बळींसह तिसऱ्या क्रमांकावर असून दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉड 73 बळींसह चौथ्या क्रमांकावर आहे. हिलीची सहकारी राहेल प्रिस्ट 72 बळींसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com