ऑस्ट्रेलियातील विजयासाठी आनंद महिंद्रांकडून सहा क्रिकेटपटूंना ‘महिंद्रा थार’

ऑस्ट्रेलियातील विजयासाठी आनंद महिंद्रांकडून सहा क्रिकेटपटूंना ‘महिंद्रा थार’
Anand Mahindra to gift Thar SUVs to six Indian cricketers

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि खेळांची आवड असलेले आनंद महिंद्राही ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने भारावले आहेत. या दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या सहा पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना ते स्वखर्चाने महिंद्रा थार ही आलिशान कार भेट देणार आहेत.

वेगवेगळ्या मुद्द्यावरून नेहमीच ट्विटवर सक्रिय असलेल्या महिंद्रा यांनी आज ट्विटवरूनची ही घोषणा केली. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना भारताच्या युवा खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारत इतिहास रचला. 

या दौऱ्यात पदार्पण करणारे नवदीप सैनी, महम्मद सिराज, शुभमन गिली, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांना आपण महिंद्रा थार ही गाडी देत असल्याचे जाहीर केले. या सहा कार कंपनीकडून नाही, तर आपण स्वतःच्या पैशातून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शार्दुल ठाकूरचा हा पदार्पण दौरा नव्हता; तरीही त्यांनी त्याला या सहा खेळाडूंमध्ये गणले आहे. शार्दुलला दोन वर्षांपूर्वी कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती; परंतु दहा चेंडू टाकल्यावर त्याला दुखावत झाली आणि त्यानंतर तो खेळला नव्हता; परंतु चौथ्या कसोटीत गोलंदाजीबरोबर पहिल्या डावात त्याने केलेली अर्धशतकी खेळी भारताच्या विजयात मोलाची ठरली होती.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com