तो ठरला जगातला ६०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

पाकच्या अझल अलीला अँडरसनने बाद केले आणि जेम्स अँडरसनने आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले. ६०० कसोटी विकेट मिळविण्याचा विक्रम तीन गोलंदाजांनी (मुथय्या मुरलीधन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी) केलेला आहे.

लंडन: एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाजांच्या शर्यतीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने आज सर्वश्रेष्ठ विक्रम केला. वेगवान गोलंदाजांमध्ये ६०० विकेट मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी त्याने हा विक्रम केला.

पाकच्या अझल अलीला अँडरसनने बाद केले आणि त्याने आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले. ६०० कसोटी विकेट मिळविण्याचा विक्रम तीन गोलंदाजांनी (मुथय्या मुरलीधन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी) केलेला आहे. आता या पंक्तीत अँडरसन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून बसला आहे.

वेगवान गोलंदाजीतले पहिले विक्रमवीर

१०० विकेट चार्ली ट्रुमन (१८९५)
२०० विकेट ॲलेस बेडसर (१९५३)
३०० विकेट फ्रेड ट्रुमन (१९६४)
४०० विकेट रिचर्ड हॅडली (१९९०)
५०० विकेट कोर्टनी वॉल्श (२००१)
६०० विकेट जेम्स अँडरसन (२०२०)

अँडरसनची उंचावत गेलेली सरासरी

१०० विकेट ३४.८०
२०० विकेट ३२.२०
३०० विकेट ३०.४३
४०० विकेट २९.३०
५०० विकेट २७.६४
६०० विकेट २६.७६

६०० विकेटसाठी टाकलेले चेंडू

३३७११ मुरलीधरन
३३७१७ अँडरसन
३४९१९ शेन वॉर्न
३८४९६ अनिल कुंबळे

अनिल कुंबळेकडून स्वागत
६०० कसोटी विकेटच्या क्‍लबमध्ये सन्माननीय सदस्य अनिल कुंबळेने अँडरसनचे लगेच अभिनंदन केले. या क्‍लबमध्ये तुझे स्वागत आहे. सर्वश्रेष्ठ गोलंदाजाकडून भलीमोठी कामगिरी अशा शब्दांत कुंबळेने अँडरसनच्या कामगिरीला सलाम केला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या