आंध्रचे गोव्यावर पूर्ण वर्चस्व; सलग पाचव्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत दाखल

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

आंध्रने सामना 103 धावांनी जिंकत गटात सर्वाधिक 20 गुण प्राप्त केले.

णजी:(Andhra completely dominates Goa Reached the semifinals with the fifth win in a row) डावखुरी सीएच झांसी लक्ष्मी हिचे खणखणीत नाबाद शतक आणि तिने व्ही. पुष्पलता हिच्या साथीत केलेली दीडशे धावांची भागीदारी या बळावर आंध्रने सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट लढतीत गोव्यावर पूर्ण वर्चस्व राखले. एलिट क गटात त्यांनी सलग पाचवा विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामना शनिवारी जयपूर येथील राजस्थान क्रिकेट असोसिएशन अकादमी मैदानावर झाला. आंध्रने सामना 103 धावांनी जिंकत गटात सर्वाधिक 20 गुण प्राप्त केले. आव्हान राखण्यासाठी शेवटच्या साखळी लढतीत गोव्यास विजय अत्यावश्यक होता, पण आंध्रच्या अष्टपैलू खेळासमोर ते शक्य झाले नाही. आंध्रने दिलेले 249 धावांचे आव्हान गोव्याला अजिबात पेलवले नाही.  स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे गोव्याचे पाच लढतीतून 12 गुण कायम राहिले. अन्य तीन लढतीत त्यांनी विजय नोंदविला. (Andhra completely dominates Goa Reached the semifinals with the fifth win in a row)

तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरुन विराटसमोर धर्मसंकंट

आंध्रने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांची कर्णधार एन. अनुषा लवकर बाद झाली, पण नंतर झांसी लक्ष्मी आणि पुष्पलता यांनी गोव्याच्या गोलंदाजाना वरचढ होऊ दिले नाही. दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची भागीदारी करत आंध्रची स्थिती मजबूत केली. अखेर वैयक्तिक 83 धावांवर पुष्पलता हिने शिखा पांडेच्या गोलंदाजीवर संजुला नाईकच्या हाती झेल दिल्याने ही जोडी फुटली. पुष्पलता हिने 113 चेंडूंतील खेळीत 11 चौकार लगावले. झांसी लक्ष्मी 100 धावांवर नाबाद राहिली. तिने 131 चेंडूंतील खेळीत 10 चौकार मारले.

गोव्याला दहा षटकांत 3 बाद 25 अशी बिकट स्थितीनंतर सावरताच आले नाही. सुगंधा घाडी व कर्णधार शिखा पांडे यांनी पाचव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला, मात्र पद्मजा हिने सुगंधाला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर इतर खेळाडूंकडून शिखाला अजिबात साथ लाभली नाही.

संक्षिप्त धावफलक

आंध्र ः 50 षटकांत 4 बाद 248 (सीएच झांसी लक्ष्मी नाबाद 100, व्ही. पुष्पलता 83, एस. हिमा बिंदू 20, के. ज्योतील नाबाद 14, शिखा पांडे 10-0-55-2, निकिता मळीक 7-2-15-1, दीक्षा गावडे 10-0-57-0, रूपाली चव्हाण 5-0-20-0, संजुला नाईक 4-0-30-0, तेजस्विनी दुर्गड 8-0-45-1, पूर्वा भाईडकर 6-0-22-0) वि. वि. गोवा ः 42.3 षटकांत सर्व बाद 145 (पूर्वजा वेर्लेकर 16, इब्तिसाम शेख 5, विनवी गुरव 0, सुगंधा घाडी 36, तेजस्विनी दुर्गड 19, शिखा पांडे 44, संजुला नाईक 1, निकिता मळीक 2, दीक्षा गावडे 2, पूर्वा भाईडकर नाबाद 8, रूपाली चव्हाण 3, के. ज्योती 1-16, ई. पद्मजा 2-31, बी. अनुषा 3-25, सीएच झांसी लक्ष्मी 1-16, सरण्या गडवाल 2-34).

संबंधित बातम्या