चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पराजित झाल्यानंतर पीएसजीच्या चाहत्यांचा धुडगुस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

संघ पराजित झाल्यावर संतप्त चाहत्यांनी दुकाने फोडली, कारचे नुकसान केले. एवढेच नव्हे, तर त्यांना रोखणाऱ्या पोलिसांवर बाटल्या फेकल्या. पोलिसांनी रबरी गोळ्यांद्वारे प्रतिकार करताना अश्रुधुराचाही वापर केला. 

पॅरिस: चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचविरुद्ध पराजित झाल्यानंतर पीएसजीच्या चाहत्यांनी फ्रान्स राजधानीत एकच गोंधळ केला. कोरोना महामारीमुळे कठोर उपाय असूनही मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी झाली.

पीएसजी चाहत्यांनी आपल्या संघाच्या स्टेडियम परिसरात अंतिम सामन्याच्या वेळी गर्दी केली होती. संघ पराजित झाल्यावर संतप्त चाहत्यांनी दुकाने फोडली, कारचे नुकसान केले. एवढेच नव्हे, तर त्यांना रोखणाऱ्या पोलिसांवर बाटल्या फेकल्या. पोलिसांनी रबरी गोळ्यांद्वारे प्रतिकार करताना अश्रुधुराचाही वापर केला. 

हुल्लडबाजांनी १२ दुकाने फोडली. १६ कारचे नुकसान केले. त्यांच्या दगडफेकीत १६ पोलिस जखमी झाले. एकंदर १४८ जणांना ताब्यात घेण्यात आले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या