विराटच्या "त्या" फोटोमध्ये त्याच संपूर्ण आयूष्य आहे

विराटच्या "त्या" फोटोमध्ये त्याच संपूर्ण आयूष्य आहे
Anushka Sharma Virat Kohli shared a photo of the girl on social media

मुंबई:  बॅालीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे  लग्नापासुन कायमच चर्चेत आहे. नुकतेच ते दोघेआई-वडील झाले आहेत. अनुष्काने तीच्या मुलीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. फोटोमध्ये विराट आणि अनुष्काने मुलीला हातात घेतले आहे. फोटोला विराट कोहली यांनी त्या फोटोला,"या फोटोमध्ये माझ सगळं आयुष्य आहे." असे कॅप्शन दिले आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना आपल्या मुलीचे नाव 'वमिका' ठेवलेे हेही सांगीतले. अनुष्काच्या मुलीचा जन्म 11 जानेवारीला झाला. जेव्हा पासुन छोटी वमिका आमच्या आयुष्यात आली तेंव्हापासुन आम्ही खुप आंनदी आहोत, असे विराटने म्हटले आहे.

वमिका या शब्दाचा अर्थ देवी दुर्गा असा होतो. म्हणुन मुलीचे नाव वमिका ठेवले आहे. असे विराट कोल्हीने म्हटले आहे. वमिका जन्मली तेंव्हा पासुन बॅालीवुड तसेच विविध माध्यमातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही महीन्यापुर्वी अनुष्का आणि विराट कोल्हीचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटो मध्ये अनुष्का योगा करत होती आणि विराट तीची मदत करत होता. 

विराट त्याच्या फॅमिलीसाठी नेहमीच जागरुक असतो आणि फॅमिलीला वेळही देतो. आँस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या दरम्यान विराट अनुष्काची काळजी घेण्यासाठी आँस्ट्रेलियाचा दौरा सोडुन भारतात परत आला होता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com